
नटराजन आणि चहलने प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेत कांगारुंच्या बलाढ्य वाटणाऱ्या बॅटिंग लाईनअपला सुरुंग लावला.
शिखर धवन आणि लोकेश राहुलने भारताच्या डावाला सुरुवात केली. सलामीवीर शिखर धवन अवघ्या एका धावेची भर घालून तंबूत परतला. त्याच्यापाठोपाठ कर्णधार विराट कोहलीही स्वस्तात माघारी फिरला. त्याने 9 धावांची भर घातली. लोकश राहुलच्या 51 धावा वगळता कोणत्याही भारतीय फलंदाजाला नावाला साजेसा खेळ करता आला नाही. अखेरच्या षटकात जडेजाने उपयुक्त फटकेबाजी करत संघाच्या धावसंख्येत 160 पार नेली. त्याने 43 धावांची नाबाद खेळी केली.
सामन्याचे अपडेट्स :
भारतीय संघाने पहिल्या सामन्यातील विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
127-7 : मार्शच्या रुपात नटराजनला पदार्पणातील सामन्यातील तिसरे यश
126-6 : हेन्रिकसच्या खेळीला चाहरने लावला ब्रेक, 30 धावा करुन तो तंबूत परतला
122-5 : मॅथ्यू हेड चहलच्या फिरकीच्या जाळ्यात, त्याने संघाच्या धावसंख्येत अवघ्या 7 धावांची भर घातली
113-4 : नटराजनला आणखी एक यश, शॉर्टला पांड्याकरवी 34 धावांवर धाडले माघारी
75-3 : मॅक्सवेल स्वस्तात माघारी, नटराजनचे आंतरराष्ट्रीय टी-20 तील पहिली शिकार
72-2: चहलला दुसरे यश, स्मिथला 12 धावांवर धाडले तंबूत
56-1 : फिंचच्या रुपात ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, चहलला मिळाले यश
----------------------------------------------------------------------------------------
152-7 : स्टार्कने घेतली वॉशिंग्टनची विकेट, त्याने 7 धावांची भर घातली
114-6 : हेन्रिक्सनं पांड्याला धाडले तंबूत, त्याने 15 चेंडूत 1 षटाकाराच्या मदतीने 16 धावांची खेळी केली.
92-5 : भारताचा अर्धा संघ तंबूत, हेन्रीकसनं लोकेश राहुलच्या खेळीला लावला ब्रेक. त्याने 51 धावांची खेळी केली.
90-4 : मनिष पांडेच्या रुपात टीम इंडियाला चौथा धक्का, झम्पाने अवघ्या 2 धावांवर धाडले माघारी
86-3 : संजू सॅमसन 23 धावांची खेळी करुन माघारी,
लोकेश राहुलचे अर्धशतक, डाव सावरण्याच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण खेळी
48-2 : कोहलीच्या रुपात टीम इंडियाला मोठा धक्का, स्वेपसनला मिळाली विकेट
11-1 : धवन अवघ्या एका धावेवर बाद, स्टार्कला मिळाले यश
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने घेतला गोलंदाजीचा निर्णय