AUS vs IND 1st Test, Day 2 : पृथ्वीचा फ्लॉप शो कायम, टीम इंडियाकडे 62 आघाडी

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 18 December 2020

पहिल्या दिवसाअखेर भारतीय संघाने 6 गड्यांच्या मोबदल्यात 233 धावा केल्या होत्या. 

Australia vs India 1st Test Day 2 : गोलंदाजांच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाअखेर 1 बाद 9 धावा केल्या असून 62 धावांची आघाडी घेतली आहे. पृथ्वी शॉने पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही निराशजनक कामगिरी केली. तो अवघ्या 4 धावांची भर घालून तंबूत परतला. त्याच्या जागी नाइट वॉचमन म्हणून जसप्रीत बुमराह मैदानात उतरला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मयांक अगरवाल (5) आणि बुमराह शून्य धावांवर नाबाद खेळत होते.  

जसप्रीत बुमराहने सुरुवातीला केलेला भेदक मारा आणि त्यानंतर अश्विनने दाखवलेली फिरकीतील कमाल याच्या जोरावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला बॅकपूटव टाकले. आघाडीच्या फ्लॉपशोनंतर टीम पेनने केलेल्या अर्धशतकीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाला 191 धावांपर्यंत मजल मारता आली. भारतीय संघाला 53 धावांची आघाडी मिळाली असून आता दुसऱ्या डावात भारतीय संघ कशी कामगिरी करणार आणि ऑस्ट्रेलियासमोर किती टार्गेट ठेवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. बर्न्स आणि वेड हे सलामीवीर प्रत्येकी 8-8 धावा करुन माघारी फिरल्यानंतर स्मिथही स्ट्रगल करताना दिसले. तो 29 धावांत अवघी एक धाव करुन माघारी फिरला आहे. अश्विनने दुसऱ्या विकेटच्या रुपात ट्रॅविस हेडला माघारी धाडले. त्यानंतर कॅमरुन ग्रीनही अश्विनच्या फिरकीत फसला. चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियन संघाने 5 बाद 92 धावा केल्या. कर्णधार टीम पेन शेवटपर्यंत मैदानात थांबला. त्याने केलेल्या नाबाद 73 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 191 धावांपर्यंत मजल मारली.    

स्टार्क-कमिन्सच्या भेदक माऱ्यासमोर दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीलाच भारतीय संघाने अवघ्या 11 धावांत चार विकेट गमावल्या. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशीच्या काही षटकातच टीम इंडियाचा पहिला डाव 244 वर खल्लास केला.  ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ऍडलेड कसोटीच्या पहिल्या दिवसाअखेर भारतीय संघाने 6 बाद 233 धावा केल्या. कर्णधार विराट कोहली (74), चेतेश्वर पुजारा (43) आणि अजिंक्य रहाणे (42) यांच्या वगळता कोणालाही म्हणावा तसा खेळ करता आली नाही. 

AUS vs IND, 1st Test Day 1: Stumps : विराटचं शतक हुकलं, दिवस ऑस्ट्रेलियाचा

पहिल्या दिवासाचा खेळ संपला तेव्हा वृद्धिमान साहा (9) आणि रविचंद्रन अश्विन (15) नाबाद परतले होता. या  जोडीनं दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. अश्विनला स्टार्कने माघारी धाडले. त्याला दुसऱ्या दिवशी एक धाव करता आली नाही. दुसऱ्या बाजूला साहाची अवस्थाही तशीच झाली, कमिन्सने त्याला तंबूत धाडले. यादव 6 आणि शमी शून्यावर बाद झाला. 

लाईव्ह अपडेट्स

- भारताने पृथ्वीच्या रुपात गमावली पहिली विकेट

- पहिल्या दिवशी पिछाडीवर असलेल्या भारताकडे 53 धावांची आघाडी

हेजलवूडची विकेट घेत उमेश यादवने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव केला खल्लास!

 

167-9 : अश्विनने नॅथन लायनला केल बाद, त्याने 10 धावांची भर घातली

139-8  : मिचेल स्टार्क आणि टीम पेन यांच्यातील ताळमेळ ढासळला, रन आउटच्या स्वरुपात भारताला मिळाली आठवी विकेट

111-7 : उमेश यादवला दुसरे यश, त्याने लाबुशेनला खातेही उघडू दिले नाही.

111-6 : उमेश यादव ट्रॅकवर, नशीबाच्या  साथीनं मैदानात धग धरलेल्या लाबुशेनची घेतली विकेट, मार्नस लाबुशेननं 47 धावा केल्या.

79-5 : कॅमरुन ग्रीन अडकला अश्विनच्या फिरकीच्या जाळ्यात 

65-4 : अश्विनन घेतली ट्रॅविस हेडची विकेट

45-3 : 29 चेंडूत अवघी एक धाव करुन स्मिथ माघारी, ऑस्ट्रेलियन संघ संकटात

 29-2 : जो बर्न्स सलामी पार्टनरएवढ्याच धावा करुन परतला, बुमराहलाच मिळाली विकेट

16-1 : बुमराहनं टीम इंडियाला मिळवून दिल पहिलं यश, सलामीवीर मॅथ्यू वेड 8 धावा करुन परतला

- बर्न्स आणि मॅथ्यू हेडनं केली ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात

Image

फोटो सौजन्य - आयसीसीच्या ट्विट हँडेलवरुन

244-10 : शमीला खातेही उघडता आले नाही, कमिन्सला मिळालं यश

240-9 : उमेश यादव 6 धावांची भर घालून माघारी

235-8 : कमिन्सन साहाला धाडले माघारी, त्यालाही वैयक्तिक धावसंख्येत एकाही धावेची भर घालता आली नाही. 

233-7 : स्टार्कने अश्विनला धाडले माघारी, त्याला दुसऱ्या दिवशी संघाच्या आणि वैयक्तिक धावसंख्येत एकाही धावेची भर घालता आली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Australia vs India 1st Test at Adelaide Day 2 Live Cricket Score Record