
ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने हा सामना गमावला तर मालिका गमावण्याची नामुष्की संघावर ओढावेल.
फिंचने दुसऱ्या वनडे सामन्यातही नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. स्टीव्हन स्मिथच मालिकेतील सलग दुसरे शतक (104), वॉर्नर (83), फिंच (60) आणि मार्नस लॅबुशेन (70), आणि ग्लेन मॅक्सवेलच्या नाबाद 63 धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा टीम इंडियासमोर डोंगराएवढं आव्हान ठेवले आहे. निर्धारित 50 षटकात ऑस्ट्रेलियानं 4 बाद 389 धावा केल्या आहेत. हार्दिक पांड्या, शमी आणि बुमराह यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.
सामन्याचे अपडेट्स आणि इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा
सामन्याचे अपडेट्स
225-4 : विराट कोहली 89 धावांवर माघारी, हेजलवूडला मिळाले यश
153-3 : अय्यरच्या रुपात भारताला तिसरा धक्का; त्याने 38 धावांचे योगदान दिले
60-2 : मयांक अगरवालही स्वस्तात माघारी, 20 धावांवर कमिन्सनं धाडल तंबूत
58-1 : शिखर धवन 30 धावा करुन माघारी, हेजलवूडनं घेतली विकेट
भारतीय संघासमोर 390 धावांचे लक्ष्य
372-4 : मार्नस लाबुशेननं 70 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली
292-3- हार्दिक पांड्याने घेतली स्मिथची विकेट, त्याने 104 धावा केल्या
-स्टीव्हन स्मिथचे वनडे मालिकेतील सलग दुसरे शतक
156-2 : श्रेयस अय्यरनं वॉर्नरला केलं रन आउट, त्याने 77 चेंडूत 83 धावा केल्या
-142-1 : शमीनं भारताला मिळवून दिलं पहिलं यश, कर्णधार फिंच कोहलीच्या हाती झेल देऊन 60 धावांवर माघारी.
-फिंच-वॉर्नर जोडी फुटली, दोघांनी पहिल्या विकेटसाठी 142 धावा कुटल्या
-वॉर्नरचे मालिकेतील दुसरे आणि कारकिर्दीतील 23 वे अर्धशतक