Aus vs Ind , 2nd Test : 'विराट' पराभवानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडिया 'अजिंक्य'

India Tour of Australia 2020,  IndiavsAustralia
India Tour of Australia 2020, IndiavsAustralia

ऑस्ट्रेलियन संघाने ठेवलेल्या 70 धावांचे आव्हान भारतीय संघाने 2 गड्यांच्या मोबदल्यात पार करत मालिकेत 1-1 बरोबरी साधली आहे. अल्प धावांचा पाठलाग करण्यासाठी मयांक अग्रवाल आणि शुभमन गिल जोडीनं भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली. 15 चेंडूत अवघ्या 5 धावा करुन माघारी फिरला. चेतेश्वर पुजाराही अवघ्या 3 धावांवर बाद झाला. शुभमन गिल आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी नाबाद परत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर भारतीय संघाने जोरदार कमबॅक करत यजमान ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलण्यात यश मिळवले आहे. चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियान 6 बाद 133 धावांवरुन खेळाला सुरुवात केली. या धावसंख्येत अवघ्या 67 धावांची भर घालून ऑस्ट्रेलियाचा संघ  200 धावांत आटोपला. त्यामुळे भारतीय संघाला 70 धावांचे टार्गेट मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 195 धावा केल्या होत्या. त्यानंतर बॅटींग करताना टीम इंडियाने 326 धावा केल्या होत्या. कर्णधार अजिंक्य रहाणे (112), रविंद्र जडेजा (57) आणि शुभमन गिल (45) यांनी महत्त्वपूर्ण खेळी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com