
मॅक्सवेलनं तुफान फटकेबाजी करत अर्धशतकी खेळी साकरली. त्याने 38 चेंडूत 59 धावा कुटल्या. बुमराहने त्याला बोल्ड करत सामना भारताच्या बाजुनं वळवला. अखेरच्या षटकात बुमराहने झम्पाला पायचित करत भारताच्या विजयावर शिक्कमोर्तब केले.
शार्दुल ठाकूरु आणि बुमराहच्या भेदक मार रविंद्र जडेजाने मोक्याच्या क्षणी घेतलेल्या विकेटच्या जोरावर अखेर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिला विजय नोंदवला. वनडे मालिका भारताने यापूर्वीच गमावली असली तरी या विजयाने पुढील टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाचा आत्मविश्वास नश्चितच उंचावेल. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधाराची अर्धशतकी खेळी आणि हार्दिक पांड्य (92)* आणि रविंद्र जडेजाने (66)* धावांच्या जोरावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 303 धावांचे लक्ष ठेवले होते.
वॉर्नरच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खराब झाली. लाबुशेनला पहिला सामना खेळणाऱ्या नटराजनने स्वस्तात माघारी धाडले. एका बाजूला फिंच तग धरुन थाबंला असताना दुसऱ्या बाजूने विकेट पडत गेल्या. फिंचने कर्णधाराला साजेशी खेळी करत संघाच्या धावसंख्येत 75 धावांचे योगदान दिले. मॅक्सवेलनं तुफान फटकेबाजी करत अर्धशतकी खेळी साकरली. त्याने 38 चेंडूत 59 धावा कुटल्या. बुमराहने त्याला बोल्ड करत सामना भारताच्या बाजुनं वळवला. अखेरच्या षटकात बुमराहने झम्पाला पायचित करत भारताच्या विजयावर शिक्कमोर्तब केले.
#नवोदित यॉर्कर स्पेशलिस्टनं ब्लू जर्सीत खेळणार; विराटने दिली ODI कॅप
सामन्याचे अपडेट्स
278-9 :एगरच्या इनिंगला नटराजनने लावला ब्रेक, त्याने 28 धावा केल्या
278-8 : सीन एबॉटच्या रुपात ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का, शार्दूल ठाकूरला आणखी एक यश
268-7 : जसप्रित बुमराहने मॅक्सवेलच्या 59 धावांच्या खेळी लावला ब्रेक
210-6 :कॅरी-मॅक्सवेलमध्ये ताळेमळ ढासळला, धावबादच्या रुपात टीम इंडियाला यश
158-5 : कॅमरुन ग्रीनलाही जडेजाने दाखवला तंबूचा रस्ता, त्याने 21 धावांचे योगदान दिले
123-4 : जडेजानं संघाला मिळवून दिलं मोठ यश, फिंच 75 धावांवर झाला बाद
117-3 : हेन्रिक्स 22 धावा करुन माघारी, शार्दूल ठाकूरला मिळाले यश
56-2 : शार्दुल ठाकुरने बॅक टू बॅक शतकी खेळी करणाऱ्या स्मिथला स्वस्तात धाडले माघारी, तो 7 धावा करुन परतला
25-1 : टी नटराजनची दमदार सुरुवात; लाबुशेनच्या रुपात मिळाली पदार्पणातील पहिली विकेट
हार्दिक पांड्या- रविंद्र जडेजा यांच्यात 150 धावांची भागीदारी, भारतीय संघ निर्धारित 50 षटकात 302 धावा
152-5 : हेजलवू़डनं घेतली विराटची विकेट, त्याने 78 चेंडूत 63 धावांची खेळी केली
123-4 : केएल राहुलचा पुन्हा फ्लॉप शो, एगरने 6 धावांवर केले पायचित
114-3 : श्रेसय अय्यर झम्पाच्या जाळ्यात अडकला, अवघ्या 19 धावा करुन तंबूत परतला
82-2 शुभमन गील 33 धावा करुन माघारी, एगरने घेतली विकेट
26-1 : धावफलकावर अवघ्या 26 धावा असताना शिखर धवन बाद झाला. एबॉटनं त्याला 16 धावांवर तंबूत धाडले. बाद केले.