esakal | Australia vs India 3rd Test Day 4 : भारत 2 बाद 98 धावा, पुजारा-अजिंक्यवर मदार
sakal

बोलून बातमी शोधा

ausvsind

सामना अनिर्णत राहणार की निकाली निघणार?

Australia vs India 3rd Test Day 4 : भारत 2 बाद 98 धावा, पुजारा-अजिंक्यवर मदार

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

शुभमन गील आणि रोहित शर्माने भारतीय संघाच्या दुसऱ्या डावाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र फटेकाजी करण्याची क्षमता असलेल्या या दोघांची विकेट घेण्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना यश मिळाले. शुभमन गिल. 31 तर रोहित शर्मा 98 चेंडूत 52 धावांची खेळी करुन माघारी फिरले आहेत.  हेजलवूडने भारतीय संघाला पहिला धक्का दिला. तर रोहितच्या रुपात कमिन्सने  आपल्या संघाला मोठे यश मिळवून दिले. चौथ्या दिवसाचा खेळ थांबण्यात आला त्यावेळी भारतीय संघाने 2 बाद 98 धावा केल्या होत्या. कर्णधार अजिंक्य रहाणे  4 (14)* आणि चेतेश्वर पुजारा 9 (29)* खेळत होते. भारतीय संघाला जिंकण्यासाठी अजूनही 309 धावांची गरज आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या संघाला 8 विकेट मिळवायच्या आहेत. 

तत्पूर्वी सिडनी कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने पाहुण्या भारतीय संघासमोर डोंगराएवढे लक्ष्य ठेवले आहे, ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 6 बाद 312 धावांवर घोषित केला. मार्नस लाबुशेन 73 (118),  स्टीव्ह स्मिथ 81(167), कॅमरुन ग्रीनने 84(132) धावा केल्या. ऑस्ट्रेलिया कर्णधार 39 धावांवर नाबाद राहिला. पहिल्या डावातील 94 धावा आणि दुसऱ्या डावातील 312 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 406 धावांची आघाडी घेत टीम इंडियासमोर 407 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. 

चहापानापूर्वीच शतकाच्या उंबरठ्यावर कॅमरुन ग्रीन बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधाराने डाव घोषीत केला. भारताकडून अश्विन-सैनी यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. तर बुमराह आणि मोहम्मद सिराजला 1-1 विकेट मिळाली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीनं भारतीय डावाला सुरुवात केली आहे. भारतीय संघ सिडनीच्या मैदानात 12 सामने खेळले आहेत. यात केवळ एक सामना त्यांना जिंकता आला आहे. यापूर्वीचा सामना टीम इंडियाने अनिर्णित राखण्यात यश मिळवले होते. 
 

loading image