प्रणीत, समीर वर्माचे सफाईदार विजय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

सिडनी - बी. साईप्रणीत आणि समीर वर्माने ऑस्ट्रेलियन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दोघांनीही विजयाची औपचारिकता झटपट पूर्ण केली.

द्वितीय मानांकित प्रणीतने इंडोनेशियाच्या पांजी अहमद मौलाना याचा २१-१२, २१-१४ असा सहज पाडाव केला; तर चौथ्या मानांकित समीर वर्माने जपानच्या तैकुमा उएदा याचे आव्हान २१-१६, २१-१२ असे लीलया परतवले. प्रणीतची लढत सातव्या मानांकित ली चेऊक यीऊ याच्याविरुद्ध होईल; तर समीरसमोर चीनच्या लु गुआंगझू याचे आव्हान असेल.

मनू अत्री- बी सुमीत रेड्डी आणि अर्जुन एमआर आणि श्‍लोक रामचंद्रन यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली. भारताच्याच दोन जोड्यांत आता लढत असल्यामुळे एका भारतीय जोडीची वाटचाल निश्‍चित आहे. मनू-सुमीतने कोरियाच्या ह्यूक ग्यून चोई-क्‍युंग हून पार्क याचा २१-१७, २१-१७ असा पाडाव केला; तर अर्जुन-श्‍लोकने हिरोकी ओकामुरा-मासायुकी ओनोदेरा या जपानच्या जोडीचे आव्हान २१-१५, २५-२३ असे परतवले.

महिला एकेरीत वैष्णवी रेड्डी चीनच्या हान यूए हिच्याविरुद्ध एकतर्फी लढतीत ५-२१, ५-२१ अशी पराभूत झाली.

Web Title: Australian Badminton Competition