Australian Open: मेदवेदेवचा धडाका सुरूच; चौथ्या फेरीत प्रवेश

Australian Open Daniil Medvedev Stefanos Tsitsipas
Australian Open Daniil Medvedev Stefanos Tsitsipas esakal

मेलबर्न: डॅनियल मेदवेदेवने (Daniil Medvedev) ऑस्ट्रेलियन ओपनमधील (Australian Open) आपला धडाकेबाज कामगिरी करण्याचा सिलसिला कायम ठेवला. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या मेदवेदेवन बॉटिक वॅन दे झँडस्कुलपचा पराभव करत चौथ्या फेरीत (4th Round) प्रवेश केला. (Australian Open Daniil Medvedev Stefanos Tsitsipas Reached In 4th Round)

Australian Open Daniil Medvedev Stefanos Tsitsipas
Video : आंद्रे रसेलची नजर हटी 'दुर्घटना' घटी

मेदवेदेवने काल कयर्गियोसचे कडवे आव्हान मोडून काढले होते. मात्र आज त्याने बॉटिकचा ६-४, ६-४, ६-२ असा एकतर्फी पराभव केला. मेदवेदेवने सामन्यावर तिसऱ्या गेमपासून पकड मिळवली होती. त्याने बॉटिकची सर्व्हिस ब्रेक केली. मेदवेदेवने (Daniil Medvedev) त्याचे तीनही ब्रेक पॉईंट सेव्ह केले. २६ विनर आणि १० एस फटके मारले. त्याने सामना १ तास ५५ मिनिटात आपल्या खिशात टाकला.

Australian Open Daniil Medvedev Stefanos Tsitsipas
IPL Mega Auction कडे 'या' खेळाडूंनी फिरवली पाठ!

दुसरीकडे रोड लेव्हर एरिनावर स्टीफानोस त्सित्सिपसने (Stefanos Tsitsipas) बेनॉईट पैरेचा पराभव करत चौथ्या फेरीत प्रवेश केला. या सामन्यातील तिसरा सेट टाय ब्रेकरवर गेला. मात्र स्टीफानोस त्सित्सिपसने सामन्यावरील आपले नियंत्रण कायम ठेवले. त्याने फ्रान्सच्या बेनॉईटचा २ तास ४२ रंगलेल्या सामन्यात पराभव केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com