राष्ट्रकुल बहिष्काराची ऑस्ट्रेलियातूनही हाक

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीचा समावेश नसल्याने ऑस्ट्रेलियाने स्पर्धेवर बहिष्कार घालण्याची मागणी शूटर्स युनियन ऑस्ट्रेलियाने केली आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेने यापूर्वीच आपण या दृष्टीने विचार करीत असल्याचे सांगितले आहे. 

सिडनी : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीचा समावेश नसल्याने ऑस्ट्रेलियाने स्पर्धेवर बहिष्कार घालण्याची मागणी शूटर्स युनियन ऑस्ट्रेलियाने केली आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेने यापूर्वीच आपण या दृष्टीने विचार करीत असल्याचे सांगितले आहे. 

गतवर्षीच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने नऊ पदके जिंकली होती. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथील स्पर्धेत नेमबाजीच्या पदक क्रमवारीत ऑस्ट्रेलिया भारतापाठोपाठ दुसरे होते. शॉटगन प्रकारात ऑस्ट्रेलियाचे नेमबाज प्रभावी कामगिरी करतात.

शूटर्स युनियन ऑस्ट्रेलिया ही नेमबाजीचे साहित्य तयार करणाऱ्या ऑस्ट्रेलियातील कंपनीची संघटना आहे. ऑस्ट्रेलियातील काही बुजुर्ग नेमबाजांनी यास पाठिंबा दिला आहे. काहींनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेवरील भारताच्या बहिष्कारास पाठिंबा देणे योग्य होईल असेही सुचवले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: australian shooting union called for commonwealth games boycott