वडगाव शेरीच्या अवंतिकाचे यश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

मुंढवा - पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या लोणकर विद्यालय भागशाळा वडगावशेरीची सुवर्णकन्या अवंतिका संतोष नरळे हिने दिल्ली येथे सुरू असलेल्या धावण्याच्या राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेत १७ वयोगटातील मुलींमध्ये १००/२०० मीटर आणि रिले शर्यतीत प्रथम क्रमांक मिळविला.

या स्पर्धेत अवंतिकाने १०० मीटर १२.०८ सेकंदांत, २०० मीटर २४.६० सेकंदांत, तर रिले शर्यत ४८.६३ सेकंद या विक्रमी वेळेत पूर्ण करत तिहेरी सुवर्णपदकाची मानकरी ठरली. अवंतिकाने गेल्या वर्षी राष्ट्रीय पातळीवर १०० मी. मध्ये ब्राँझ पदक मिळविले होते. या वर्षी तिने १०० आणि २०० मीटर दोन्हींमध्ये सुवर्णपदक मिळविले आहे. खेलो इंडिया २०१८ मध्ये तिने १०० मीटर धावण्यात सुवर्णपदक मिळविले होते. अवंतिकाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अजित पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, संदीप कदम, मोहनराव देशमुख, एल. एम. पवार, भगवान गोफणे, प्रदीप कदम, एम. एम. पिरजादे, प्राचार्य पवार राजेंद्र, उपप्राचार्य व्ही. व्ही. सर्जे, सरिता सूर्यवंशी, संभाजी जगताप आदींनी तिचे अभिनंदन केले. अवंतिकाला क्रीडा शिक्षक शिवाजी म्हेत्रे, अशोक मोरे, मशकूर पिरजादे, मोहन भोसले, राजेंद्र भोसले, विठ्ठल मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Avantika Narale Running Gold Medal