
बीडच्या अविनाश साबळेने अमेरिकेतला 30 वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम मोडला
भारताच्या अविनाश साबळेने 5000 मीटरमध्ये बहादूर प्रसादचा 30 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला आहे. यूएसए येथील सॅन जुआन कॅपिस्ट्रानो येथे साऊंड रनिंग ट्रॅक मीटमध्ये 13:25.65 च्या वेळेसह नवीन राष्ट्रीय विक्रम नोंदवला आहे. महाराष्ट्रतील बीड जिल्ह्यातील 27 वर्षीय अविनाश साबळेने 1992 मध्ये बहादूर प्रसादचा 13:29.70 चा जुना विक्रम मोडला आहे. (Avinash Sable Breaks 30-Year-Old Record Of Bahadur Prasad)
हेही वाचा: रोहित शर्माचा एक सिक्स आणि गेंड्यांना मिळालं ५ लाखांचं गिफ्ट; काय आहे प्रकरण?
साबळेने सैन जुआनमधील त्याच्या शर्यतीत 12 वे स्थान मिळविले आहे. परंतु त्याच्या अंतरावरील केवळ दुसऱ्या स्पर्धात्मक शर्यतीत भाग घेणाऱ्या व्यक्तीसाठी ही एक उल्लेखनीय कामगिरी होती. त्याने यापूर्वी कोझिकोड येथील फेडरेशन कपमध्ये 5000 मीटर धावले होते जेथे त्याने 13.39.43 वेळेसह पूर्ण केले होते. साबळेचा 5000 मीटरमध्ये राष्ट्रीय विक्रम देखील तीन वेगवेगळ्या विषयांमध्ये राष्ट्रीय विक्रम करणारा तो सध्या एकमेव भारतीय बनला आहे. साबळेने हाफ मॅरेथॉन तसेच पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस या प्राथमिक स्पर्धेत राष्ट्रीय विक्रमही केला आहे.
Web Title: Avinash Sable Breaks 30 Year Old Record Of Bahadur Prasad In 5000 Meter Race Setting A New National Record
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..