अजहरची उच्च न्यायालयात जाणार 

पीटीआय
सोमवार, 16 जानेवारी 2017

हैदराबाद - हैदराबाद क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे माजी कर्णधार महंमद अजहरुद्दीन याने उच्च न्यायालयात धाव घ्यायचे ठरविले आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितीकडे सुद्धा तो दाद मागण्याची शक्‍यता आहे. निवडणूक अधिकारी के. राजीव रेड्डी यांनी अझरचा अर्ज नाकारला. त्यामुळे निराश झालेल्या अजहरने सांगितले, की "रेड्डी यांनी कोणतेही कारण दिले नाही. मला लेखी कारण हवे आहे.' ही निवडणूक येत्या मंगळवारी होणार आहे. 

Web Title: Azhar will be the High Court