महंमद अजहरुद्दीनचा अर्ज फेटाळला

वृत्तसंस्था
शनिवार, 14 जानेवारी 2017

अजहरवर "बीसीसीआय'ने 2000 मध्ये मॅच-फिक्‍सिंगबद्दल आजन्म बंदी घातली आहे. अजहरने त्यास न्यायालयात आव्हान दिले. आंध्र उच्च न्यायालयाने 2011 मध्ये त्याच्या बाजूने निकाल दिला, पण "बीसीसीआय'ने बंदी अधिकृतरीत्या कधीच उठविली नाही. 

हैदराबाद - हैदराबाद क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी माजी कर्णधार महंमद अजहरुद्दीन याने केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. 

निवडणूक निर्णय अधिकारी के. राजीव रेड्डी यांनी महंमद अजहरुद्दीनचा अर्ज फेटाळत बीसीसीआयने अजहरवर मॅच फिक्सिंग प्रकरणी घातलेल्या आजन्म बंदीबाबत समाधानकारक स्पष्टीकरण दिले नसल्याचे म्हटले आहे. 17 जानेवारीला ही निवडणूक होणार आहे. 

लोढा समितीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे अर्शद अयूब यांना पद सोडावे लागले होते. अजहरवर "बीसीसीआय'ने 2000 मध्ये मॅच-फिक्‍सिंगबद्दल आजन्म बंदी घातली आहे. अजहरने त्यास न्यायालयात आव्हान दिले. आंध्र उच्च न्यायालयाने 2011 मध्ये त्याच्या बाजूने निकाल दिला, पण "बीसीसीआय'ने बंदी अधिकृतरीत्या कधीच उठविली नाही. 

Web Title: Azharuddin’s nomination for HCA president rejected