अपंगांच्या स्पॅनिश बॅडमिंटन स्पर्धेत सुकांतला दोन ब्राँझ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

पुणे - अपंगांच्या स्पॅनिश आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सुकांत कदम याने पुरुषांच्या ‘एसएल ४’ या प्रकारात एकेरीसह दुहेरीत ब्राँझपदक पटकावले.

या दोन्ही प्रकारांत सुकांतने उपांत्य फेरी गाठून ब्राँझपदक निश्‍चित केले. एकेरीची उपांत्य फेरी गाठताना सुकांतने इंग्लंडच्या बॉबी ग्रिफिन याचा २१-९, २१-११ असा पराभव केला. उपांत्य फेरीत त्याला फ्रान्सच्या ल्युकास माझूर याने पराभूत केले. ल्युकासने ही लढत २१-१०, २१-१० अशी सहज जिंकली. युरोपियन चॅंपियन असलेल्या ल्युकासने नंतर मलेशियाच्या बाक्री ओमर याचा २१-१७, २१-६ असा पराभव करून विजेतेपददेखील पटकावले.

सुकांतने दुहेरीत विक्रम कुमारच्या साथीत उपांत्य फेरी गाठली. त्यांनी मार्सेल ॲडम (जर्मनी)-सिमन क्रूझ माँजेअर (स्पेन) या जोडीचा २१-१३, २१-१६ असा पराभव केला. उपांत्य फेरीत सुकांत-उमेश यांनी इंग्लंडच्या डॅनिएल बेथेल-बॉबी ग्रिफिन या जोडीने १७-२१, २१-१३, २१-१३ असे हरविले. 

Web Title: Badminton Championship sukant two bronze medol