नागपूरची मालविका बनसोड विजेती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

पुणे - वर्धा येथे झालेल्या वरिष्ठ गटाच्या राज्य निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेत नागपूरच्या मालविका बनसोडने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले; तर पुण्याची मानसी गाडगीळने महिला दुहेरीत विजेती ठरली.    

पुणे - वर्धा येथे झालेल्या वरिष्ठ गटाच्या राज्य निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेत नागपूरच्या मालविका बनसोडने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले; तर पुण्याची मानसी गाडगीळने महिला दुहेरीत विजेती ठरली.    

या स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम लढतीत मालविका बनसोडने द्वितीय मानांकित वैष्णवी भालेवर २१-१८, २१-१२ असा विजय मिळविला. तत्पूर्वी, मालविका बनसोडने रंगतदार सामन्यात रेवती देवस्थळेवर एक सात पाच मिनिटांच्या खेळानंतर २१-१८, १७-२१, २१-१६ असा विजय मिळविला. दुसऱ्या लढतीत वैष्णवी भालेने पुण्याच्या श्रुती मुंदडाला २१-१७, २१-१२ असे हरविले.  
महिला दुहेरीचे विजेतेपद मानसी गाडगीळ (पुणे) व मृण्मयी सावजी (नागपुर) या अव्वल मानांकित जोडीने पटकावले. त्यांनी अंतिम लढतीत ठाण्याच्या रम्शा फारुकी व मृण्मयी देशपांडे या जोडीवर २३-२१, २१-१५ असा विजय मिळविला.

तत्पूर्वी, उपांत्य फेरीत मृण्मयी देशपांडे व रम्शा फारुकी या जोडीने दुसरे मानांकन असलेल्या नागपूरच्या भक्ती दहासहस्र व मुंबई उपनगरच्या वैष्णवी अय्यर या जोडीवर २१-१९, २१-२३, २१-१७ असा; तर मानसी गाडगीळ व मृण्मयी सावजी या जोडीने मुंबई शहरच्या अक्षया वारंग व मुंबई उपनगरच्या कल्पिता सावंत जोडीचा २१-११, २१-१५ असा पराभव केला होता.

Web Title: badminton competition