बॅडमिंटन कोर्टला बेटिंगचा विळखा; BWF ची चीनच्या खेळाडूंवर कारवाई

Badminton World Federation Take Action against 4 Chinese Player
Badminton World Federation Take Action against 4 Chinese Player ESAKAL

जागतिक बॅडमिंटन फेडरेशनने बेटिंग (Badminton World Federation) संदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी चीनच्या हे जी टिंग, टान कियाओंग, ली जून हूई आणि लियू यू चेन या खेळाडूंवर कारवाईचा बडगा उगारला आहे. BWF ने चार खेळाडूंनी बेटिंग (Betting) संदर्भातील कलम 3.1.2 चे उल्लंघन केल्याचे सांगितले. त्यांच्यावर 2018 मध्ये झालेल्या चायना ओपन स्पर्धेत अविश्वसनीय निकाल, सामना जिंकण्यासाठी आपले सर्वोत्तम प्रयत्न न करणे असा ठपका ठेवण्यात आला आहे.

Badminton World Federation Take Action against 4 Chinese Player
जडेजा कॅप्टन्सीसाठी सीएसके सोडण्याची होती शक्यता : आकाश चोप्रा

या प्रकरणी स्वतंत्र सुनावणीदरम्यान या खेळाडूंवर बॅडमिंटन संबंधित कोणत्याही उपक्रमात सहभागी होण्यापासून तीन महिन्याची बंदी घालण्यात आली आहे. मात्र ही शिक्षा 25 जानेवारी 2022 पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. या दोन वर्षाच्या काळात जर या खेळाडूंकडून अशाच प्रकारची चूक झाली तर तीन महिन्याच्या बंदीचा निर्णय घेण्यात येईल. याच बरोबर 2018 च्या चीन ओपनमध्ये मिळवलेल्या प्राईस मनीवर खेळाडूंना पाणी सोडावे लागणार आहे. या स्पर्धेत जी टिंग आणि टॅन क्विआंग यांनी 12,250 युएस डॉलर आणि ली जून हूई आणि लियू यू चेन यांनी मिळवलेल्या 2,187.50 युएस डॉलर प्राईस मनी जिंकले होते.

Badminton World Federation Take Action against 4 Chinese Player
VIDEO: 'आवा दे' म्हणत गुजरात टायटन्सने केले ANTHEM रिलीज

कायदेशील प्रक्रियेनुसार या खेळाडूंना स्वतंत्र सुणावणीदरम्यान दिलेल्या निकालाविरोधात दात मागण्याचा अधिकार आहे. ते कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉ स्पोर्ट्सकडे (CAS) 21 दिवसात दाद मागू शकतात. आतापर्यंत तरी अशी दाद मागण्यात आलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com