बजरंग पुनीयाला सुवर्ण संधी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

मुंबई - जागतिक कुस्ती स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताच्या हाती फारसे काही लागले नाही. भरात असलेला बजरंग पुनियाने ६५ किलो वजनी गटात गाठलेली अंतिम फेरी आणि सुमीत मलिकला  ब्राँझ जिंकण्याची असलेली संधी, हीच भारतासाठी जमेची बाब ठरली.

मुंबई - जागतिक कुस्ती स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताच्या हाती फारसे काही लागले नाही. भरात असलेला बजरंग पुनियाने ६५ किलो वजनी गटात गाठलेली अंतिम फेरी आणि सुमीत मलिकला  ब्राँझ जिंकण्याची असलेली संधी, हीच भारतासाठी जमेची बाब ठरली.

सध्या फॉर्मात असणाऱ्या बजरंग पुनियाने जागतिक स्पर्धेतील आपली सुवर्णपदकाची अपेक्षा कायम ठेवली. अत्यंत चुरशीने झालेल्या ६५ किलो वजनी गटातील उपांत्य लढतीत त्याने अलजेंद्रो एन्‍रिस व्हाल्डेस तोबिएरचे आव्हान परतवून लावत अंतिम फेरी गाठली. राष्ट्रकुल, आशियाई सुवर्णपदकापाठोपाठ आता जागतिक सुवर्णपदकाची बजरंगला चांगली संधी आहे. तगड्या तोबिएरचे आव्हान परतविताना बजरंगचा कस लागला. पण त्याने ४-१ अशी आपली आघाडी भक्कम ठेवत विजय मिळविला. त्यापूर्वी बजरंग पुनियाने मंगोलियाच्या तुमुर ऑचिरविरुद्ध सुरवातीस ४-१ आघाडी घेतली होती; पण त्यानंतर त्याने वर्चस्व गमावले. त्याने ४० सेकंदांत दोन गुण गमावले, पण अखेरच्या सेकंदात संयम राखत बजरंगने विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली होती.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा विजेता सुमीत बुडापेस्टला सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत चीनच्या झिवेई डिंगविरुद्ध ०-५ असा पराजित झाला. त्यापूर्वी त्याने कझाकस्तानचा इनकॅर येमामुकामंबेत याला ६-१ आणि जपानचा ताईकी यामामोतो याला ४-१ असे हरवून अपेक्षा उंचावल्या होत्या. आता तो रविवारी रात्री उशिरा ब्राँझपदकाची लढत खेळेल. सोनबा गोंगाणे ६१ किलो गटात उपांत्यपूर्व फेरीत हरला.

Web Title: bajrang punia Wrestling Competition