असा टाकला बॉल की थेट हेलमेटमध्येच अडकून राहिला!

Ball gets stuck in Trent Boults helmet in test between SLvsNZ
Ball gets stuck in Trent Boults helmet in test between SLvsNZ

नवी दिल्ली : सध्या क्रिकेटविश्वात तगडे वेगवान गोलंदाज आहेत. त्यांच्या वेग पाहता फलंदाजांच्या मनात धडकी भरते. अनेकवेळा फलंदाजांच्या हेल्मेटला चेंडू लागल्याचे आपण पाहतो. मात्र, श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत चक्क चेंडू फलंदाजाच्या हेल्मेटमध्येच घुसला आणि तेथेट अडकूनही राहिला. 

न्यूझीलंडचा संघ फलंदाजी करत असताना 82व्या षटकात ट्रेंट बोल्ट स्ट्राईकवर होता. त्याने या चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न केला मात्र तो हुकला आणि चेंडू थेट बोल्टच्या हेल्मेटमध्ये घुसला. 

त्यानंतर 83.2 षटकांत न्यूझीलंडचा डाव 249 धावांवर संपुष्टात आला. आता श्रीलंका केवळ 22 धावांनी पिछाडीवर आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com