कर्णधार स्मिथ, वॉर्नर, बॅंक्रॉफ्ट दोषी

वृत्तसंस्था
बुधवार, 28 मार्च 2018

जोहान्सबर्ग -  दक्षिण आफ्रिके-विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात झालेल्या चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कर्णधार स्टीव स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि चेंडू कुरतडण्याची प्रत्यक्ष कृती करणारा कॅमेरॉन बॅंक्रॉफ्ट या तिघांना दोषी ठरवले असून, त्यांच्यावरील अंतिम कारवाई २४ तासांत जाहीर केली जाईल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलॅंड यांनी मंगळवारी स्पष्ट केले. प्रशिक्षक डॅरेन लिमन यांना मात्र क्‍लिन चीट देण्यात आली आहे. यष्टिरक्षक टीम पेनी याची कसोटी कर्णधार म्हणूनदेखील निवड करण्यात आली. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत वर्चस्व मिळविण्यासाठी चेंडू कुरतडण्याची लबाडी स्मिथ, वॉर्नर आणि बॅंक्रॉफ्ट यांनी केल्यामुळे क्रिकेट विश्‍वात खळबळ उडाली होती. आयसीसीने याप्रकरणी स्मिथवर एका सामन्याची बंदी घातली असली तरी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्वतंत्र चौकशी सुरू केली. या प्रकाराची माहिती घेण्यासाठी सदरलॅंड आज दक्षिण आफ्रिकेत आले. दिवसभर चौकशी समितीबरोबर चर्चा केल्यानंतर त्यांनी रात्री उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत क्रिकेट विश्‍वाबरोबर ऑस्ट्रेलियन नागरिकांची जाहीर माफीही मागितली.

केवळ ऑस्ट्रेलिया क्रिकेटचीच नव्हे, तर आम्ही संपूर्ण क्रिकेट विश्‍वाची माफी मागत आहोत, अशी दिलगिरी जेम्स सदरलॅंड यांनी व्यक्त केली. या प्रकारामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची पत आणि विश्‍वासार्हता कमी झाली आहे. याचा परिणाम लहान पिढीवर होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या गैरप्रकारात केवळ हे तिघेच खेळाडू सहभागी होते. प्रशिक्षक लिमन यांना याची माहिती नव्हती, त्यामुळे या तीन खेळाडूंशिवाय इतर कोणावर कारवाई केली जाणार नाही, असे ते म्हणाले. त्यामुळे लीमनच यापुढेही प्रशिक्षक राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

विजय महत्त्वाचा असतोच; परंतु त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत लबाडी करणे नीतिमत्तेच्या विरोधात आहे. या तिघा खेळाडूंनी केलेला गुन्हा गंभीर आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. 

Web Title: ball tampering Captain Smith Warner Bankrup guilty Johannesburg cricket