बंगळुरु संघाने शब्द पाळला नाही - गेल 

वृत्तसंस्था
बुधवार, 2 मे 2018

नवी दिल्ली - संधी मिळताच आपल्या बॅटचा हिसका दाखवणारा आणि चौकार-षटकारांची आतषबाजी करून चार सामन्यांत 252 धावा करणाऱ्या ख्रिस गेलची आता "बोलंदाजी' सुरू झाली आहे. आयपीएलमधील अगोदरचे फ्रॅंचाईस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (आरसीबी) आपल्याला संघात कायम ठेवतो हा दिलेला शब्द लिलावाच्या वेळी फिरवला, अशी फटकेबाजी गेलने केली आहे. 

यंदाच्या आयपीएलसाठी होणाऱ्या लिलावापूर्वी आरसीबीने आपल्याला संघात कायम राखण्याची खात्री दिली होती; परंतु त्यानंतर त्यांच्याकडून काहीच कळवण्यात आले नाही. त्यांनी मोठे नुकसान करून घेतले आहे. पुन्हा कॉल न केल्यामुळे आपल्याला संघात ते घेणार नाहीत हे मला कळून चुकले होते, असा गौप्यस्फोट गेलने केला आहे. 

आरसीबीकडून खेळताना गतवेळची आयपीएल गेलसाठी खराब गेली होती. नऊ सामन्यांत मिळून त्याने 122 च्या स्ट्राईक रेटने केवळ 200 धावाच केल्या होत्या; मात्र गतवर्षी सीपीएल आणि बीपीएलमध्ये त्यांनी धावांचा खच पाडला होता. बांगलादेश लीगच्या अंतिम सामन्यात 18 षटकार ठोकताना 146 धावा केल्या होत्या. 

आयपीएलमध्ये यंदा गेल अनसोल्ड राहणार असे वाटत असताना तिसऱ्या आणि अंतिम लिलावात पंजाब संघाने त्याला दोन कोटींच्या पायाभूत किमतीवर आपल्या संघात घेतले. 

माझ्यासाठी कोणताही संघ बोली लावत नव्हता, याचे मला आश्‍चर्य वाटत होते. बंद दरवाजामागे काय घडत होते हे कळत नव्हते; पण अशा गोष्टी कधी कधी घडत असतात. बदल होत असतो. पंजाब संघाकडून खेळण्याची संधी मिळाली त्यासाठी मी आभारी आहे. 
- ख्रिस गेल 

Web Title: The Bangalore team did not follow the word - Gayle