Shakib Al Hasan
Shakib Al Hasan

बांगलादेशचा विंडीजला तडाखा; 322 धावांचे लक्ष्य पार

टॉन्टन : सलामीला दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का देणाऱ्या बांगलादेशने यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत आणखी एक सनसनाची विजय मिळवला. वेस्ट इंडीजचे तब्बल 322 धावांचे आव्हान पार केले आणि गुणतक्‍त्यात पाचव्या स्थानी झेप घेतली. स्पर्धेतले स्वतःचे दुसरे शतक करणारा शकिब अल हसन आणि त्याने लिटॉन दाससह केलेली 135 चेंडूतील नाबाद 189 धावांची भागीदारी निर्णायक ठरली. 

ख्रिस गेल आणि आंद्रे रसेल हे तडाखेबंद फलंदाज शुन्यावर बाद होऊनही 321 धांवा उभारून विंडीजने एक बाजू भक्कम केली होती, परंतु आपल्या सलामीच्या सामन्यात उसळत्या चेंडूंचा मारा करून पाकिस्तानला शरण आणणारी विंडीजची गोलंदाजी आज बांगलादेशसमोर निष्प्रभ ठरली. 

त्रिशतकी धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणे सोपे नसते, इंग्लंडविरूद्धही बांगलादेशने प्रयत्न केले होते. पण आज मात्र नियोजनबद्ध वाटचाल आणि आक्रमण करून त्यांनी इतिहास रचला. तमिम इक्‍लाब आणि सौम्या सरकार यांची सहापेक्षा अधिक धावांची अर्धशतकी सलामी त्यानंतर भरवशाचा मुशफिकर रहिम लवकब बाद झाला तरी त्याचे दडपण न घेता शकिबने एका बाजूने ठोस वाटचाल कायम ठेवली. लिटॉन दासने त्याला तेवढीच मोलाची साथ दिली त्यामळे बांगलादेशने हे आव्हान 41.3 षटकातट पार केले. 

या त्रिशतकी धावांचा पाठलाग करताना कोठेही बांगलादेशवर दडपण आल्याचे कोठेच जाणवले नाही. अंतिम टप्यात तर आवश्‍यक धावांची सरासरी त्यांनी सहापेक्षा कमी ठेवली आणि सामना एकतर्फीच करून टाकला. 

ख्रिस गेल आणि रसेल हे त्यांचे खंदेवीर, परंतु 13 चेंडू खेळल्यानंतर गेल एकही धाव करू शकला नाही; तर 4 बाद 242 अशा सुस्थितीनंतर 40 व्या षटकात बाह्या सरसावत मैदानात आलेला आंद्र रसेल दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतरही विंडीजने 321 धावा केल्या. त्यात एविन लुईस (70), शाय होप (97) शिमरॉन हेटमेर (50) यांचे योगदान मोलाचे ठरले. अखेरच्या षटकांत कर्णधार जेसन होल्डर आणि डॅरन ब्रावो यांची आक्रमकताही मोलाची ठरली. 

विंडीजच्या पहिल्या तिन्ही सामन्यात अपयशी ठरलेल्या लुईससाठी हा सामना महत्वाचा होता. त्याने सावध फलंदाजी केली, पण जम बसल्यानंतर आपल्या भात्यातले सर्व फटके बाहेर काढले. होपचा पवित्रा मात्र आक्रमक होता. या दोघांबरोबर हेटमेरनेही बांगलादेशच्या गोलंदाजीचा फायदा घेतला, पण या तिघांनाही शतकापर्यंत मजल मारता आली नाही. 

संक्षिप्त धावफलक ः वेस्ट इंडीज ः 50 षटकांत सर्वबाद 321 (एविन लुईस 70-67 चेंडू, 6 चौकार, 2 षटकार, शाय होप 96-121 चेंडू, 4 चौकार 1 षटकार, शिमरॉन हेटमेर 50-26 चेंडू, 4 चौकार, 3 षटकार, जेसन होल्डर 33-15 चेंडू, 4 चौकार, 2 षटकार, डॅरेन ब्रावो 19-15 चेंडू, 2 षटकार, महम्मद सैफउद्दीन 10-1-72-3, मुस्तफिझूर रहीम 9-0-59-3, शकीब अल हसन 8-0-54-2) पराभूत वि. बांगलादेश 41.3 षटकांत 3 बाद 322 (तमिम इक्‍बाल 48 -53 चेंडू, 6 चौकार, शकिब अल हसन नाबाद 124 -99 चेंडू, 16 चौकार, लिटॉन दास नाबाद 94 -69 चेंडू, 8 चौकार, 4 षटकार, आंद्रे रसेल 6-0-42-1)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com