बार्सिलोना अव्वल, रेयाल माद्रिदची हार

पराभवाने निराश झालेले रेयाल माद्रिदचे खेळाडू
पराभवाने निराश झालेले रेयाल माद्रिदचे खेळाडू

माद्रिद : बार्सिलोनाने ला लिगा अर्थात स्पॅनिश लीग फुटबॉलमध्ये अव्वल क्रमांक मिळवला, त्याच वेळी ला लिगात याच मोसमात बढती मिळालेल्या रेयाल मॅलोरकाविरुद्ध रेयाल माद्रिदला सनसनाटी हार पत्करावी लागली.

रेयाल माद्रिद 13 वर्षांनंतर सॅन मॉईक्‍स स्टेडियममध्ये पराजित झाले. त्या वेळी त्यांच्या संघात झिनेदिन झिदान, डेव्हिड बेकहॅम आणि रॉबिन्हो होते; तर या वेळी झिदान संघाचे मार्गदर्शक आहेत. ज्युनियर लागो याने पूर्वार्धात केलेल्या गोलच्या जोरावर मॅलोरकाने या वेळी बाजी मारली. दर तीन दिवसांनी आपण सर्वोत्तम आहोत हे दाखवण्याचे आव्हान आमच्यासमोर येते. नेमके हेच जमत नाही. कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. यंदा काही साध्य करायचे असेल तर खेळात आमूलाग्र सुधारणा आवश्‍यक आहे, असे झिदान यांनी सांगितले.

लिओनेल मेस्सी, लुईस सुआरेझ आणि अँतॉईन ग्रिएझमनच्या गोलमुळे बार्सिलोनाने एईबारला 3-0 हरवले. बार्सिलोनाचा हा सलग पाचवा विजय. त्याच वेळी ऍटलेटिको माद्रिदला व्हॅलेन्सियाविरुद्ध 1-1 बरोबरी स्वीकारावी लागली. यामुळे बार्सिलोनाने या मोसमात प्रथमच अव्वल क्रमांक मिळवला आहे.

युव्हेंटिसचा निसटता विजय
रोम ः ख्रिस्तियानो रोनाल्डोने कारकिर्दीतील गोलसंख्या 701 वर नेली, तरीही युव्हेंटिसला सिरी ए मध्ये बोलोग्नाविरुद्ध 2-1 अशा निसटत्या विजयावर समाधान मानावे लागले. अर्थात, त्यानंतरही युव्हेंटिस आणि दुसऱ्या क्रमांकावरील इंटर मिलान यांच्यात चार गुणांचा फरक आहे. तीन गोलांची आघाडी दवडल्यामुळे ऍटलांटास तिसऱ्या क्रमांकावर राहावे लागले.

बायर्न अग्रस्थानापासून दूर
बर्लिन ः बायर्न म्युनिचला भरपाई वेळेत बरोबरीचा गोल स्वीकारावा लागला, त्यामुळे त्यांचे बंडसेल्गा अर्थात जर्मनी साखळीतील अव्वल क्रमांक मिळवण्याची संधी हुकली. बोरुसिया मोएशेनग्लॅडबॅश तसेच वोल्फसबर्ग अजूनही संयुक्त अव्वल आहेत. त्यांनी बायरनला एका गुणाने मागे टाकले आहे. बायरन यापूर्वीच्या लढतीत हॉफेनहेमविरुद्ध 1-2 पराजित झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com