पॉग्बासाठीचा प्रयत्न बार्सिलोनाने सोडला

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

बार्सिलोना (स्पेन) - विश्‍वकरंडक विजेत्या फ्रान्सचा हुकमी खेळाडू पॉल पॉग्बाला मॅंचेस्टर युनायटेडकडून आपल्याशी करारबद्ध करण्याचे प्रयत्न बार्सिलोनाने सोडून दिले आहे. त्यामुळे पॉग्बा मॅंचेस्टरकडेच राहण्याची शक्‍यता बळावली आहे. पॉग्बा हे जबरदस्त खेळाडू आहे. त्याला आमच्या संघात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते; परंतु ते आता शक्‍य होईल असे वाटत नाही, असे बार्सिलोनाचे संचालक अरेंदो बरिदा यांनी एका संकेतस्थळाशी बोलताना सांगितले. फ्रान्सने विश्‍वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात क्रोएशियाविरुद्ध मिळवलेल्या विजेतेपदामध्ये पॉग्बाने गोल केला होता.

तो अगोदरपासून मॅंचेस्टर युनायटेडचा खेळाडू राहिलेला आहे; परंतु या क्‍लबच्या प्रशिक्षकांशी असलेल्या मतभेदामुळे तो क्‍लब सोडणार असल्याची चर्चा सुरू होती. या संधीचा फायदा घेत बार्सिलोनाने त्याच्यासाठी प्रयत्न केले होते. इंग्लिश प्रीमियर लीगच्या सलामीच्याच सामन्यात पॉग्बाकडे मॅंचेस्टरचे कर्णधारपद देऊन त्याची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Web Title: Barcelona make final decision on Paul Pogba