मेस्सी लग्न करणार

पीटीआय
शनिवार, 17 डिसेंबर 2016

बार्सिलोना - एफसी बार्सिलोना आणि अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आता आपली मैत्रिण ऍन्टोनेला रॉकुझो हिच्याशी विवाह बंधनात अडकणार आहे. विशेष म्हणजे त्यांना थिएगो (चार वर्षे) आणि माटेओ (एक वर्ष) अशी दोन मुले आहेत. मेस्सीला फुटबॉलच्या व्यग्र कार्यक्रमातून वेळ मिळाल्यावर हा विवाह होणार असल्याचे वृत्त स्पॅनिश दैनिकांनी दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेस्सीचा विवाह सोहळा या दोघांची पहिली भेट झालेल्या अर्जेंटिनातच होणार आहे.
 
Web Title: Barcelona star Lionel Messi is set to marry Antonella