बास्केटबॉल कोर्टवर साखरपुडा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

टाउन्सव्हील सेंटरमध्ये इंग्लंडचा पुरुष आणि महिला संघ एका अनोख्या घटनेचे साक्षीदार ठरले. पुरुष संघाने कॅमेरूनचा ८१-५४ असा पराभव केल्यानंतर हा योग जुळून आला. या संघातील जॅमेल अँडरसनचा गर्लफ्रेंड जॉर्जिया जोन्स हिच्याशी साखरपुडा झाला. बास्केटबॉल कोर्टवर गुडघ्यात झुकून त्याने जॉर्जियाला मागणी घातली, पण हे इतके सहज घडले नाही. आधी जॅमेलने सामना संपल्यानंतर संघातील सहकाऱ्यांना कोर्टवरच थांबण्याची विनंती केली. सर्व जण उत्सुकतेने थांबले. त्यानंतर त्याने जॉर्जियाला आमंत्रित केले. आपल्या बॉयफ्रेंड टीमबरोबर फोटो काढून घेण्यासाठी बोलाविले असावे, असे तिला वाटले.

टाउन्सव्हील सेंटरमध्ये इंग्लंडचा पुरुष आणि महिला संघ एका अनोख्या घटनेचे साक्षीदार ठरले. पुरुष संघाने कॅमेरूनचा ८१-५४ असा पराभव केल्यानंतर हा योग जुळून आला. या संघातील जॅमेल अँडरसनचा गर्लफ्रेंड जॉर्जिया जोन्स हिच्याशी साखरपुडा झाला. बास्केटबॉल कोर्टवर गुडघ्यात झुकून त्याने जॉर्जियाला मागणी घातली, पण हे इतके सहज घडले नाही. आधी जॅमेलने सामना संपल्यानंतर संघातील सहकाऱ्यांना कोर्टवरच थांबण्याची विनंती केली. सर्व जण उत्सुकतेने थांबले. त्यानंतर त्याने जॉर्जियाला आमंत्रित केले. आपल्या बॉयफ्रेंड टीमबरोबर फोटो काढून घेण्यासाठी बोलाविले असावे, असे तिला वाटले. मग जॅमेल जेव्हा झुकला आणि त्याने मागणी घातली तेव्हा सर्वांना स्वीट सरप्राईज मिळाले. जॉर्जियाला मग आनंदाश्रू अनावर झाले.

Web Title: basketball court engagement jamal anderson and georgia jones