पुणे, नागपूर संघ ठरले खासदार उदयनराजे भाेसले करंडकाचे मानकरी

सिद्धार्थ लाटकर 
गुरुवार, 7 जून 2018

छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकूल येथे स्पर्धेतील मुलींच्या गटातील अंतिम सामना यजमान सातारा विरुद्ध नागपूर संघात झाला. यामध्ये नागपूरने 78-59 असा 19 गुणांच्या फरकाने विजय मिळविला. नागपूरच्या विजयात देवश्री आंबेगावकर (18 गुण), अभा लाड (17 गुण) यांची कामगिरी सरस ठरली. सातारा संघाकडून श्रृती भोसले (21 गुण), चैतन्या राजे (14 गुण) यांनी उत्तम खेळ केला. 

सातारा : रणजीत अकादमी व सातारा पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या 35 व्या राज्य अजिंक्‍यपद युवा गटाच्या बास्केटबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात पुणे संघाने तर मुलींच्या गटात नागपूर संघाने विजेतेपद मिळवित खासदार उदयनराजे भोसले करंडकावर मोहर उमटवली.

छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकूल येथे स्पर्धेतील मुलींच्या गटातील अंतिम सामना यजमान सातारा विरुद्ध नागपूर संघात झाला. यामध्ये नागपूरने 78-59 असा 19 गुणांच्या फरकाने विजय मिळविला. नागपूरच्या विजयात देवश्री आंबेगावकर (18 गुण), अभा लाड (17 गुण) यांची कामगिरी सरस ठरली. सातारा संघाकडून श्रृती भोसले (21 गुण), चैतन्या राजे (14 गुण) यांनी उत्तम खेळ केला. 

मुलांच्या गटात पुणे संघाने यजमान सातारा संघावर 71-64 अशी सात गुणांनी मात केली. पुण्याच्या ज्ञानेश पाटील (22 गुण), प्रितीश कोकाटे (17 गुण) यांचा विजयात मोलाचा वाटा ठरला. साताऱ्याच्या यशराज राजेमहाडीक (25 गुण) आणि दिप अवकीरकर (19 गुण) यांनी अन्य खेळाडूंच्या साथीने पुणे संघास टक्कर दिली. स्पर्धेतील दाेन्ही अंतिम सामने पाहण्यासाठी सातारकर क्रीडाप्रेमींची माेठ्या संख्येने उपस्थिती हाेती.

Web Title: Basketball tournament in Satara