BCCI : लैंगिक शोषणाविरोधात धोरण अवलंबणार

'बीसीसीआय’चा पुढाकार; ‘वर्ल्डकप’साठी कार्यकारी गट स्थापणार
BCCI
BCCIsakal

नवी दिल्ली - भारतीय कुस्ती क्षेत्रात लैंगिक शोषणामुळे वादळ उठले असतानाच आता ‘बीसीसीआय’कडून याविरोधात कठोर पाऊल उचलण्यात येणार आहे. बीसीसीआयने येत्या २७ मे रोजी विशेष सर्वसाधारण बैठकीचे आयोजन केले आहे.

या बैठकीत पाच महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात येणार असून त्यामध्ये लैंगिक शोषण प्रतिबंधित धोरणाचाही समावेश आहे. शिवाय या बैठकीत भारतामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार असलेल्या एकदिवसीय विश्‍वकरंडकासाठी कार्यकारी गटाचीही स्थापना करण्यात येणार आहे.

BCCI
BCCI World Cup 2023 : अहमदाबादमध्ये बैठक; आयपीएल फायनलपूर्वीच वर्ल्डकप सामन्यांची ठिकाणे होणार फायनल

बीसीसीआयचे माजी सीईओ राहुल जोहरी यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आल्यानंतर बीसीसीआयकडून अंतर्गत तक्रार समितीची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये चार जणांचा समावेश होता. आता या समितीत आणखी काही व्यक्तींचा समावेश करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच धोरणातही बदल करण्यात येणार आहे.

भारतामध्ये एकदिवसीय विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी कार्यकारी गटाची स्थापना होणार आहे. यामध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार, सीईओ व इतर पदाधिकारी असणार आहेत.

BCCI
Pune : कात्रज कोंढवा रस्ता परिसरात वीज पुरवठा खंडित

विश्‍वकरंडकाच्या लढतींसाठी काही ठिकाणांची यादी तयार करण्यात आली आहे. अशा स्टेडियमच्या नूतनीकरणासाठी बीसीसीआयकडून आर्थिक मदत करण्यात येणार आहे. विश्‍वकरंडकापर्यंत ही सर्व स्टेडियम पूर्णपणे सज्ज होतील अशापद्धतीने वेगात काम करण्यात येणार आहे. महिला प्रीमियर लीग आणि राज्य संघांचाही विचार,बीसीसीआयकडून आगामी बैठकीत महिला प्रीमियर लीग व राज्य संघांचाही विचार करण्यात येणार आहे.

BCCI
Mumbai : कचऱ्यातील टाकाऊ वस्तुंचा पुनर्वापर करणार; केडीएमसी हद्दीत 10 संकलन केंद्रे

हे पाच मुद्दे महत्त्वाचे ठरणार...

पायाभूत सुविधा विकास आणि अनुदान समितीची स्थापना

राज्य संघांमध्ये फिजियोथेरेपीस्ट आणि प्रशिक्षकांच्या नियुक्तीसाठी मार्गदर्शक तत्त्वे

एकदिवसीय विश्‍वकरंडकासाठी कार्यगटाची निर्मिती

महिला प्रीमियर लीगच्या समितीची स्थापना

लैंगिक छळ प्रतिबंधक धोरणास मान्यता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com