IPL 2020 : आता आयपीएलमध्येही 'हॉल ऑफ फेम'; दादाची भन्नाट कल्पना

वृत्तसंस्था
सोमवार, 2 डिसेंबर 2019

आयपीएलची 2008मध्ये सुरवात झाल्यापासून देशातील आणि परदेशातील अनेक खेळाडूंनी अविश्वसनीय कामगिरी केली आहे. त्यांचा गौरव करण्यासाठी बीसीसीआयने ही कल्पना मांडली आहे. 

नवी दिल्ली : बीसीसीआयचया अध्यक्षपदी भारताचे माजी कर्णधार सौरभ गांगुली विराजमान झाल्यापासून भारतीय क्रिकेटमध्ये वेगाने बदल होत आहेत. रविवारी झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्यातील एक म्हणजेच दादाने आयपीएलमध्ये भन्नाट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी 'हॉल ऑफ फेम' सुरु करण्याची कल्पना सुचविली आहे. 

गांगुलीची 'दादागिरी' सुरू; क्रिकेट लीग बंद करण्याचा दिला इशारा

आयपीएलची 2008मध्ये सुरवात झाल्यापासून देशातील आणि परदेशातील अनेक खेळाडूंनी अविश्वसनीय कामगिरी केली आहे. त्यांचा गौरव करण्यासाठी बीसीसीआयने ही कल्पना मांडली आहे. 

Sourav Ganguly, Gautam Gambhir

''आयपीएलमध्ये भन्नाट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी आयपीएल हॉल ऑफ फेम सुरु करण्यात येईल,'' असे गांगुलींनी सांगितले. 

आयपीएल लिलाव होण्यापूर्वी द्रविडने दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाला...

रविवारी बीसीसीआयची 88वी वार्षिक सर्वसाधाराण सभा पार पडली. या सभेत सौरव गांगुली यांचा भारतीय मंडळाच्या अध्यक्षपदाचा कालावधी 2024 पर्यंत वाढविण्यासाठी नव्या कार्यकारिणीने प्रयत्न करण्याचे ठरविले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BCCI To Come Up With A Hall Of Fame For Exceptional Players In IPL