बीसीसीआयने काढली सात जागांची भरती

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 जुलै 2019

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत टीम इंडियाला गाशा गुंडाळावा लागल्यानंतर सर्वात जास्त टीकेचे धनी राहिलेल्या संघ व्यवस्थापनाचा कालवधी संपला होता,  त्यामळे नव्या टीमचा शोध सुरु होणार हे स्वाभिवक होते त्यानुसार बीसीसीआयने प्रक्रिया सुरु केली आहे. 

मुंबई :  विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत टीम इंडियाला गाशा गुंडाळावा लागल्यानंतर सर्वात जास्त टीकेचे धनी राहिलेल्या संघ व्यवस्थापनाचा कालवधी संपला होता,  त्यामळे नव्या टीमचा शोध सुरु होणार हे स्वाभिवक होते त्यानुसार बीसीसीआयने प्रक्रिया सुरु केली आहे. 

 

1) मुख्य प्रशिक्षक
2) फलंदाजीचे प्रशिक्षक
3) गोलंदाजी प्रशिक्षक
4) क्षेत्ररक्षक प्रशिक्षक
5) फिजिओथेरपिस्ट 
6) स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक 
7) प्रशासकीय व्यवस्थापक

अशा सात जागांसाठी नियुक्ती होणार आहे. इच्छुकांना अर्ज करण्यासाठी ३० जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.

शास्त्री आणि टीमला पुन्हा संधी?

रवी शास्त्री यांच्या विद्यमान संघ व्यवस्थापनाला या निवड प्रक्रियेत थेट प्रवेश मिळणार आहे, परंतु त्यांना आपली इच्छा कळवावी लागेल, असे बीसीसीआयने म्हटले आहे. 

या महिन्या अखेर सुरु होणाऱ्या विंडीज दौऱ्यासाठी शास्त्री आणि त्यांच्या टीममला या दौऱ्यापूरती मुदतवाढ देण्यात आली आहे, परंतु त्यानंतर मात्र संघ व्यवस्थापनात बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडविरुदधच्या उपांत्य सामन्यात भारताची फलंदाजी ठेपाळली होती तसेच चौथ्या क्रमांकाचा प्रश्न अखेरपर्यंत सोडवू न शकलेले फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांना पुन्हा संधी न मिळण्याचे संकेत मिळत आहेत. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक यांना मात्र पुन्हा संधी मिळेल तसेच मुख्य प्रशिक्षक म्हणून शास्त्री यांना आणखी एक संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BCCI invites applications for post of coach