esakal | आयपीएलचा प्रस्ताव फेटाळणं बीसीसीआयला पडलं महागात

बोलून बातमी शोधा

ipl
आयपीएलचा प्रस्ताव फेटाळणं बीसीसीआयला पडलं महागात
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चेन्नई : जैवसुरक्षा वातावरण तयार करण्यात आलेले असले, तरीही प्रत्येक संघात कोरोना (corona) रुग्ण वाढू लागल्यामुळे बहुचर्चित आयपीएल (IPL suspend) अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्याचा निर्णय 'बीसीसीआय'ने घेतला. स्पर्धा अर्धवट ठेवण्याची अशी वेळ बीसीसीआयवर (BCCI) प्रथमच ओढवली आहे. 'अनिश्चित काळासाठी' आम्ही आयपीएल स्थगित (IPL suspend) केली आहे. या महिन्यात पुढे स्पर्धा होणे शक्यच नाही. येत्या काळात जर वेळ उपलब्ध झाला, तर त्या काळात उर्वरित स्पर्धा पार पाडू', असे आयपीएलचे कार्याध्यक्ष ब्रिजेश पटेल (IPL president Brijesh Patel) यांनी सांगितले. (BCCI not accepting IPL proposal)

हेही वाचा: IPL 2021 : बायो-बबलचा फुगा फुटला; या हंगामाचा 'खेळ खल्लास'

हैदराबाद संघाचा खेळाडू वृद्धिमन साहा आणि दिल्लीचा फिरकी गोलंदाज अमित मिश्रा यांनाही कोरोना झाल्याचे निदान झाल्यामुळे कोरोनाने आता प्रत्येक संघातच मोठा शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बीसीसीआयने लगेचच हालचाली सुरू केल्या आणि स्पर्धा तत्काळ स्पर्धा थांबवण्याचा निर्णय जाहीर केला.आयपीएल एका आठवड्यावर असताना लीग भारताऐवजी अमिरातीत घेण्याची सूचना आयपीएल प्रशासकीय समितीने केली होती, पण भारतीय मंडळाच्या कार्यकारिणीने हा प्रस्ताव फेटाळला होता असे समजते.

भारतात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे संकेत मार्चच्या अखेरीस मिळण्यास सुरुवात झाली होती. त्याच सुमारास ब्रिजेश पटेल अध्यक्ष असलेल्या समितीने कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढल्यास आयपीएल संयोजनात अडचणी येतील, त्यामुळे स्पर्धा अमिरातीत घेण्याची सूचना केली होती.

आयपीएल प्रशासकीय समितीच नव्हे, तर चार फ्रँचाईजनी लीग पुन्हा अमिरातीत घेण्याचे सुचवले होते; मात्र भारतीय मंडळ लीग भारतात घेण्यास आग्रही होते. २०२० च्या लीगमुळे जास्त आर्थिक फायदा अमिरातीचा झाला, असा त्या वेळी विचार करण्यात आला होता.