विराट-रोहितमधील वादावर बीसीसीआयचे मोठे विधान

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 जुलै 2019

- रोहित शर्मा- विराट कोहली यांच्यातील वाद ही निव्वळ अफवा
- वर्ल्ड कप संपला आता नव्या हेडलाईन नको का? म्हणून अशा अफवांना उधाण
- शिखर धवन आणि विजय शंकर यांच्याबाबत निर्णय निवड समितीच घेईल

नवी दिल्ली : विश्वकरंडकाच्या उपांत्यफेरीत झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाच विराट कोहली आणि रोहित शर्मा असे दोन गट पडल्याची चर्चा होती. तसचे प्रशिक्षक रवी शास्त्रींना हटविण्याची मागणीही खेळाडू करत असल्याची चर्चा होता. मात्र, आता संघ व्यवस्थापनाने यावर मोठे स्पष्टीकरण दिले असून कोहली आणि रोहित यांच्यातील वाद ही निव्वळ अफवा असल्याचा खुलासा केला आहे. 

''ही पूर्णपणे अफवा आहे आणि अशा अफवांनी भारतीय संघात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. वर्ल्ड कप संपला आहे आणि आता लोकांना नव्या हेडलैाईन हव्या आहेत बाकी काही नाही. स्वत:च्या फायद्यासाठी लोकं काहीही अफवा पसरवतात याचे वाईट वाटते,'' असे मत संघ व्यवस्थापनातील सदस्याने व्यक्त केले. 

शिखर धवन आणि विजय शंकर यांच्या दुखापतीबद्दल माहिती देताना ते म्हणाले, ''शिखर धवन आणि विजय शंकर यांच्याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. निवड समिती प्रमुख त्यावर निर्णय घेतील.''  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BCCI opens up on fight between Virat Kohli and Rohit Sharma