गांगुलीची 'दादागिरी' सुरू; क्रिकेट लीग बंद करण्याचा दिला इशारा

टीम ई-सकाळ
रविवार, 1 डिसेंबर 2019

नुकत्याच झालेल्या भारत-बांगलादेश दौऱ्यावेळी बांगलादेशचा माजी कर्णधार शाकिब अल हसनवर सट्टेबाजांच्या संपर्कात राहिल्यामुळे बंदी घातली होती.

मुंबई : बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता.1) मुंबईत झाली. या बैठकीत नवनिर्वाचित अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एक मोठा निर्णय घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे एप डाऊनलोड करा

क्रिकेट खेळामध्ये वाढलेल्या मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीसारख्या अनिष्ट प्रवृत्तींना बळ मिळत आहे. यामुळे आता देशांतर्गत सुरू असलेल्या क्रिकेट लीगवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय गांगुली यांनी घेतला आहे. 

- युवा क्रिकेटपटूंनो, राहुल द्रविड सांगतोय मानसिक आरोग्याचे महत्त्व!

नुकतीच कर्नाटक प्रीमिअर लीग पार पडली. या स्पर्धेत अनेक गैरप्रकार घडले. त्यामुळे अशा लीग बंद करण्याचा निर्णय गांगुली यांनी घेतला आहे. तसेच जर अशा स्पर्धा भरवायच्या असतील, तर त्यासाठी कडक नियम लागू करण्यात येतील, असेही स्पष्ट केले.

- 'दादासाठी कायपण!' बीसीसीआय नियमात करणार बदल

दरम्यान, काही वर्षांपूर्वी आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगचे प्रकार घडले होते. तसेच दोन संघांवर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या भारत-बांगलादेश दौऱ्यावेळी बांगलादेशचा माजी कर्णधार शाकिब अल हसनवर सट्टेबाजांच्या संपर्कात राहिल्यामुळे बंदी घातली होती. क्रिकेट खेळावर डाग लागलेल्या काही घटनांमुळे हे पाऊल उचलले असल्याचे गांगुली यांनी स्पष्ट केले.

- आयपीएल लिलाव होण्यापूर्वी द्रविडने दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाला...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BCCI president Sourav Ganguly takes big decision about Karnataka Premier League