पुजारा, हरमनप्रीतची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 मे 2017

बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रीडा मंत्रालयाकडे आम्ही अर्जुन पुरस्कारासाठी पुजारा आणि हरमनप्रीत यांच्या नावाची शिफारस केली आहे. गेल्या मोसमात या दोघांची कामगिरी जबरदस्त झाली आहे.

नवी दिल्ली - भारतीय कसोटी संघाचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत सिंग यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

गेल्या कसोटी मोसमात चेतेश्वर पुजाराने कमालीची फलंदाजी करत धावा जमाविल्या होत्या. तर, हरमनप्रीतची कामगिरीही उल्लेखनीय झाली होती. याच कामगिरीच्या जोरावक त्यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी शिफारस झाली आहे. मात्र, बीसीसीआयने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी यंदा कोणाचीही शिफारस केलेली नाही.

बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रीडा मंत्रालयाकडे आम्ही अर्जुन पुरस्कारासाठी पुजारा आणि हरमनप्रीत यांच्या नावाची शिफारस केली आहे. गेल्या मोसमात या दोघांची कामगिरी जबरदस्त झाली आहे. पुजाराने कसोटी मोसमात सर्वाधिक 1316 धावा केल्या आहेत. तर, महिलांच्या मर्यादित षटकांच्या सामन्यात हरमनप्रीतने चांगली कामगिरी केली आहे. 

Web Title: BCCI recommends Cheteshwar Pujara, Harmanpreet Singh's name for Arjuna award