कार्तिकला बसला 'बीसीसीआय'च्या नोटीसचा दणका!

Dinesh-Karthik
Dinesh-Karthik

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याने आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी 'बीसीसीआय'कडून मिळालेल्या नोटिशीनंतर बिनशर्त माफी मागून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 

कार्तिक मध्यंतरी कॅरेबियन लीगमधील एक सामना शाहरुख खान याची मालकी असलेल्या ट्रिनबागो नाईट रायडर्सच्या ड्रेसिंग रुमध्ये बसून बघताना दिसून आला. यानंतर हे सगळे नोटिस आणि माफीनाम्याचे नाट्य रंगले. 

'बीसीसीआय'च्या आयपीएलमध्ये देखील शाहरुख खानची कोलकता नाईट रायडर्स ही फ्रँचाईजी आहे. कार्तिक या संघाचा कर्णधार आहे. कॅरेबियन लीगमध्ये खेळण्याची परवानगी मागितलेली नसतानाही कार्तिक ट्रिनबागो संघाची जर्सी घालून त्यांच्याच ड्रेसिंगरूममध्ये बसून सामना बघत होता. यानंतर 'बीसीसीआय'ने कडक पाऊल उचलले. तुझा मध्यवर्ती करार का रद्द करू नये? अशा कडक नोटिसच त्यांनी कार्तिकला बजावली. 

या नोटिसला उत्तर देताना कार्तिकने 'बीसीसीआय'ची बिनशर्त माफी मागितली आहे. 'बीसीसीआय'ची पूर्व परवानगी न घेता कॅरेबियन लीगचे सामने पाहण्यासाठी विंडीजला गेलो, ही चूक झाली. त्याबद्दल माफी मागतो', असे त्याने क्रिकेट मंडळाला लिहिलेल्या माफीनाम्यात ठळकपणे म्हटले आहे. त्याचबरोबर कोलकता नाईट रायडर्सचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅकलम यांच्या सांगण्यावरूनच आपण ट्रिनबागो संघाची जर्सी घालून सामना पाहिला, असेही नमूद केले आहे. या संघाच्या कुठल्याही सामन्यात किंवा त्यांच्या कार्यक्रमात मी सहभाग घेतलेला नाही. ट्रिनबागोच्या उर्वरित एकाही सामन्याला आपण उपस्थित राहणार नाही याची मी खात्री देतो, असेही त्याने 'बीसीसीआय'ला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. 

विशेष म्हणजे 'बीसीसीआय'च्या नोटिशीला उत्तर देत कार्तिकने लगेच मायदेशी रवाना होण्यासाटी पोर्ट ऑफ स्पेन सोडले आहे. कार्तिकच्या या बिनशर्त माफीनाम्यामुळे प्रशासक समिती या विषयाला येथेच पूर्णविराम देण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com