Asia Cup 2023 : अखेर विषय संपणार! पाकिस्तानच्या 'त्या' प्रस्तावाला BCCI हिरवा कंदील दाखवणार?

Asia Cup 2023 BCCI vs PCB
Asia Cup 2023 BCCI vs PCB esakal

Asia Cup 2023 BCCI vs PCB : आयपीएलचा हंगाम संपत आला तरी अजून आशिया कप कुठं खेळायचा, त्याच्या तारखा याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. भारतीय क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये आशिया कप कुठे खेळवायचा याच्याबद्दल वाद होता. भारताने पाकिस्तानमध्ये आशिया कप खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आशिया कप त्रयस्थ ठिकाणी हलवण्याची मागणी भारताने केली होती. त्यावर पाकिस्तानने आढेवेढे घेत एक हायब्रीड मॉडेलचा प्रस्ताव ठेवला. त्याला आशियाई देशांकडून समर्थन मिळाल्यानंतर आता बीसीसीआय देखील या हायब्रीड मॉडेलला हिरवा कंदील दाखवण्याची शक्यता आहे.

Asia Cup 2023 BCCI vs PCB
Ravindra Jadeja MS Dhoni Controversy : धोनीसोबत फाटल्याची चर्चा; त्यात जडेजा पती - पत्नींचा ते ट्विट...

जरी बीसीसीआय पाकिस्तानच्या हायब्रीड प्रस्तावाला मान्यता देण्याची शक्यता असली तरी ही मान्यता काही अटी आणि शर्तींसह असले अशी चर्चा आहे. यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ऑक्टोबर महिन्यात होणारा वनडे वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतात येण्याचे लिखीत आश्वासन दिले पाहिजे या अटीचा देखील समावेश आहे.

जरी बीसीसीआय पाकिस्तानचे हे हायब्रीड मॉडेल स्विकारण्यास तयार असल्याचे समोर येत असले तरी त्याबाबचा अंतिम निर्णय हा बीसीसीआयच्या 27 मे रोजी होणाऱ्या सर्वसाधारण बैठकतीच घेतला जाणार आहे. पाकिस्तानी माध्यमांनी बीसीसीआयने नरमाईची भुमिका घेतल्याचे वृत्त दिले आहे. बीसीसीआय संपूर्ण आशिया कपच पाकिस्तानमधून हलवण्यासाठी आग्रही होता. मात्र पाकिस्तानने भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपवरच बहिष्कार घालण्याची भुमिका घेतली.

Asia Cup 2023 BCCI vs PCB
Virat Kohli : 'पुढच्या हंगामात नक्की...' RCB प्लेऑफमधून बाहेर पडल्यानंतर विराट कोहलीचे पहिले पोस्ट

आता बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांनी पीसीबीच्या नव्या हायब्रीड मॉडेलला पाठिंबा दर्शवला. त्यामुळे आता बीसीसीआयने आपल्या भुमिकेत नरमाई आणली आहे. बीसीसीआय आपल्या सर्वसाधारण बैठकीत पीसीबीचा हायब्रीड मॉडेल प्रस्ताव स्विकारण्याची शक्यता आहे.

Asia Cup 2023 : काय आहे पाकिस्तानचे हायब्रीड मॉडेल?

- नव्या हायब्रीड मॉडेलनुसार आशिया कप दोन व्हेन्यूवर खेळवण्यात येईल.

- स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात भारत सोडून सर्व देश पाकिस्तानमध्ये 4 सामने खेळतील.

- स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात हे सर्व देश त्रयस्थ ठिकाणी भारताविरूद्ध खेळतील.

- हे सामने युएई किंवा श्रीलंका या दोनपैकी एका देशात खेळवले जातील.

- मात्र भारत, बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि श्रीलंकेनं युएईमध्ये सामने खेळण्यास विरोध केला आहे. कारण याकाळात युएईमध्ये प्रचंड उष्णता असते.

- जर भारत फायनलमध्ये प्रवेश करण्यास अयशस्वी ठरला तरी फायलन ही त्रयस्थ ठिकाणीच होणार.

- ज्यावेळी आशियाई क्रिकेट काऊन्सील हे हायब्रीड मॉडेल जाहीर करेल त्यावेळी आशिया कपचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात येईल. जूनच्या शेवटच्या आठवड्यात याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com