वर्ल्डकपला जाताना सावध राहा, अमेरिकेचा देशवासींना इशारा 

वृत्तसंस्था
रविवार, 17 जून 2018

रशियात सुरू असलेल्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे स्पर्धेसाठी तेथे जाताना सावधगिरी बाळगा किंवा प्रवासाचा फेरविचार करा, असा इशारा अमेरिका सरकारने आपल्या देशवासींना दिला आहे. विश्‍वकरंडकासारख्या मोठ्या स्पर्धा नेहमीच अतिरेक्‍यांसाठी टार्गेट असतात, असे अमेरिकेच्या गुप्त खात्याचे म्हणणे आहे.

वॉशिंग्टन - रशियात सुरू असलेल्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे स्पर्धेसाठी तेथे जाताना सावधगिरी बाळगा किंवा प्रवासाचा फेरविचार करा, असा इशारा अमेरिका सरकारने आपल्या देशवासींना दिला आहे. विश्‍वकरंडकासारख्या मोठ्या स्पर्धा नेहमीच अतिरेक्‍यांसाठी टार्गेट असतात, असे अमेरिकेच्या गुप्त खात्याचे म्हणणे आहे.

सुरक्षारक्षा अतिशय कडक असली, तरी दहशतवादी स्टेडियम किंवा जेथे प्रेक्षक अधिक संख्येने उपस्थित असतात ती ठिकाणे, पर्यटनाची ठिकाणे, प्रवासाची ठिकाणे येथे हल्ला करू शकतात, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

विविध देशांतील सुरक्षिततेचा अंदाज घेत अमेरिका आपल्या देशवासींना सावध करण्यासाठी सावधगिरीचे इशारे देत असते. क्‍युबा, पाकिस्तान, तुर्कस्तान, होंडारुस आणि निकारंगुआ या देशांबाबत ते नेहमीच सावध असतात. 

Web Title: Be cautious when going to the World Cup says america