बीट्रीसचा स्टीपलचेस शर्यतीत विश्‍वविक्रम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

मोनॅको - केनियाच्या बीट्रीस चेपकोएच हिने ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत विश्‍वविक्रम नोंदविला आहे. आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्‍स महासंघाच्या डायमंड लीग हर्क्‍युलस स्पर्धेत तिने ही कामगिरी केली.

बीट्रीसने आठ मिनिटे ४४.३३ सेकंद वेळेचा उच्चांक प्रस्थापित केला. यापूर्वीचा उच्चांक आठ मिनिटे ५२.७८ सेकंद वेळेचा होता. बहारीनच्या रुथ जेबेटने दोन वर्षांपूर्वी पॅरिसमधील स्पर्धेत ही कामगिरी केली होती.

बीट्रीस २७ वर्षांची आहे. तिने आधीच्या उच्चांकात आठ सेकंदांपेक्षा जास्त सुधारणा केली. विशेष म्हणजे या शर्यतीचा विश्‍वविक्रम स्वतःच्या नावावर असलेली ती केनियाची पहिलीच महिला धावपटू ठरली. तिच्यासाठी ही कामगिरी बहुमोल ठरली. रिओ ऑलिंपिक तसेच जागतिक स्पर्धेत तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. या शर्यतीत तिने निर्विवाद वर्चस्व राखले. तिने तीन ‘लॅप’ बाकी असतानाच इतर प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. १६ सेकंदांपेक्षा जास्त फरकाने तिने शर्यत जिंकली. अमेरिकेच्या कोर्टनी फ्रेरीच्सने (९ः००.८५) वेळेसह दुसरे स्थान मिळविले. तिने अमेरिकी राष्ट्रीय विक्रम केला.

बिट्रीसने मोसमाच्या प्रारंभापासून विश्‍वविक्रमाची तयारी केली होती.

मोनॅकोतील हवामान, उत्साही प्रेक्षक आणि एकूणच वातावरण प्रेरक असल्यामुळे येथे सर्वोत्तम संधी असल्याचे तिला वाटले होते. ही सारी योजना सफल झाल्याबद्दल तिने आनंद व्यक्त केला.

पहिल्या लॅपपासून मी स्क्रीनवरील वेळेवर लक्ष ठेवत होते. विश्‍वविक्रम नोंदविण्याची मला खात्री होती. मी कृतार्थ झाले आहे.
- बिट्रीस चेपकोएच, केनियाची धावपटू

Web Title: beatrice chepkoech world record in steeplechase competition