वर्ल्डकप फीव्हरमुळे रशियात ट्रेनमध्ये बिअरही मिळणार 

वृत्तसंस्था
रविवार, 10 जून 2018

विश्‍वकरंडक फुटबॉल चाहत्यांनी ट्रेनचा उपयोग करावा, यासाठी अखेर नियमात बदल झाला आहे. ट्रेनमध्ये बिअर देण्याची सूट स्पर्धा कालावधीत देण्याचे अखेर ठरले आहे. 

मॉस्को - विश्‍वकरंडक फुटबॉल चाहत्यांनी ट्रेनचा उपयोग करावा, यासाठी अखेर नियमात बदल झाला आहे. ट्रेनमध्ये बिअर देण्याची सूट स्पर्धा कालावधीत देण्याचे अखेर ठरले आहे. 

विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी आलेल्या परदेशी पाहुण्यासाठी खास मोफत ट्रेन सेवा देणार असल्याचे रशियाने जाहीर केले; पण या ट्रेनमध्ये मद्य सेवनास प्रतिबंध असल्यामुळे त्याचा किती वापर होईल, अशी विचारणा केली जात होती. अखेर ट्रेनच्या डायनिंग काही सौम्य मद्य देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. 

व्होडका अथवा व्हिस्कीला संयोजकांनी परवानगी दिली नाही. बिअर, ड्राय वाईन, शेरीला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे; मात्र याचे सेवन केवळ डायनिंग कारमध्येच करता येईल; अन्यथा 1500 रुबलपर्यंत दंड होणार आहे. 

Web Title: beer in Russias train due to World Cup fever