बेळगावचे ८ जण केपीएलमध्ये

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

बेळगाव - बेळगावच्या क्रिकेट विश्‍वात पुन्हा एकदा महत्त्वाचे पान अधोरेखित झाले असून यंदा पहिल्यांदाच केपीएलच्या (कर्नाटक प्रिमीयर लीग) सातव्या हंगामात बेळगावच्या सात खेळाडूंसह एका प्रशिक्षकाची निवड करण्यात आली. तर राज्यात अभिमन्यू मिथुनला ८ लाखांची बोली मिळून तो सर्वांत महागडा खेळाडू ठरला.

बेळगाव - बेळगावच्या क्रिकेट विश्‍वात पुन्हा एकदा महत्त्वाचे पान अधोरेखित झाले असून यंदा पहिल्यांदाच केपीएलच्या (कर्नाटक प्रिमीयर लीग) सातव्या हंगामात बेळगावच्या सात खेळाडूंसह एका प्रशिक्षकाची निवड करण्यात आली. तर राज्यात अभिमन्यू मिथुनला ८ लाखांची बोली मिळून तो सर्वांत महागडा खेळाडू ठरला.

बंगळूरमधील केएससीए स्टेडियमच्या सभागृहात शनिवारी (ता. २१) केपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या लिलाव झाला. यामध्ये बेळगावच्या स्वप्नील येळवेला बळ्ळारी टस्कर्सने ३ लाख ५५ हजार रुपयात खरेदी केले. याच संघात माजीद मकानदार २० हजार तर मागील वर्षीचा क्रिकेटपटू रोहन कदम याने संघात कायम ठेवले. विजापूर बुल्सने जलदगती गोलंदाज रोनित मोरेला संघात कायम ठेवले तर अमर घाळीला २० हजार रुपयांच्या बोलीत खरेदी केले. हुबळी टायगर्सने तडाखेबाद फलंदाज राहुल नाईक याला ७५ हजार रुपयांच्या बोलीने खरेदी केले. विजापूर बुल्सने ऋतुराज भाटेला २० हजार रुपयांच्या बोलीत खरेदी केले. या संघाच्या प्रशिक्षकपदी माजी रणजीपटू दीपक चौगुले धुरा सांभाळणार आहे.

मागील वर्षी या स्पर्धेतील सहभागी झिशानअल्ली सय्यद, दर्शन पाटील, इश्‍पाक नझीर सहभागी होते. यंदा त्यांना कोणत्याही संघाने बोली लावली नाही. आजगायत या स्पर्धेत बेळगावच्या रोहन कदमला २ लाख ५० हजार ही सर्वोधिक बोली होती. पण या वर्षी बळ्ळारी टस्कर्सने बेळगावच्या स्वप्नील येळवेला ३ लाख ५५ हजार रुपयांत खरेदी केले.

रॉबिन उथप्पा आणि इतरही..
पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या सातव्या हंगामात केपीएलसाठी बेळगाव पॅंथर्स, नम्म शिमोगा, हुबळी टायगर्स, विजापूर बुल्स, म्हैसूर वॉरियर्स, बळ्ळारी टस्कर्स, बंगळूर ब्लास्टर संघाचा समावेश आहे. स्पर्धेत अभिमन्यू मिथूनसह रॉबिन उथप्पा, एच. एस. शरथ, अमित वर्मा आदी नावाजलेले खेळाडू सहभागी असणार आहेत.

Web Title: Belgaum News 8 cricketers from Belgaum in KPL