Ben Stokes Creates History: ना बॅटिंग, ना बॉलिंग अन् ना किपिंग तरी पण स्टोक्सने केलाय कहर रेकॉर्ड | Ben Stokes Test Records | Cricket News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ben Stokes Creates History

Ben Stokes Creates History: ना बॅटिंग, ना बॉलिंग अन् ना किपिंग तरी पण स्टोक्सने केलाय कहर रेकॉर्ड

Ben Stokes Creates History : इंग्लंडने आयर्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. यासह इंग्लंडने आता अॅशेस मालिकेची तयारी सुरू केली आहे. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडच्या अनेक फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाला सावध राहण्याचे संकेत दिले.

या सामन्यात ओली पोप ते जोश टोंगची कामगिरी चांगली होती. पण इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये एक अनोखा विक्रम आहे.

145 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फलंदाजी, गोलंदाजी आणि कीपिंगशिवाय सामना जिंकणारा बेन स्टोक्स हा पहिला कर्णधार ठरला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बेन स्टोक्सपूर्वी कोणत्याही देशाच्या कर्णधाराला असा विजय मिळाला नव्हता. दोन्ही देशांमधील हा केवळ दुसरा कसोटी सामना होता. विशेष म्हणजे 2019 मध्ये खेळलेला पहिला सामनाही चार दिवसांचा होता, जो इंग्लंडने 143 धावांनी जिंकला होता.

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आयर्लंडने पहिल्या डावात 172 धावा केल्या, त्याला प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने 4 विकेट गमावत 524 धावा करत डाव घोषित केला. दुसऱ्या डावात आयर्लंडच्या संघाने थोडी चांगली फलंदाजी केली पण तरीही त्यांना केवळ 362 धावा करता आल्या, त्यानंतर इंग्लंडला विजयासाठी केवळ 11 धावा मिळाल्या. अवघ्या 4 चेंडूत हे सोपे लक्ष्य गाठून इंग्लंडने सामना जिंकला.

इंग्लंडसाठी या सामन्यात ओली पोपने 208 चेंडूत 205 धावांची शानदार खेळी केली. तसेच तो इंग्लंडसाठी सर्वात जलद द्विशतक झळकावणारा फलंदाज बनला आहे. ओली पोपने 208 चेंडूंच्या खेळीत 22 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याच्याशिवाय बेन डकेटनेही 178 चेंडूत 182 धावा केल्या. बेन डक्टने 178 चेंडूंच्या खेळीत 24 चौकार आणि 1 षटकार लगावला.