IPL 2023 : दुखापतीने त्रस्त बेन स्टोक्स ‘आयपीएल’मध्ये खेळणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ben Stokes CSK IPL 2023

IPL 2023 : दुखापतीने त्रस्त बेन स्टोक्स ‘आयपीएल’मध्ये खेळणार!

Ben Stokes CSK IPL 2023 : इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स यंदाच्या वर्षी आयपीएलमध्ये खेळण्यावर ठाम आहे. स्टोक्सला चार वेळेचे आयपीएलचे विजेते चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने आपल्याकडे 16.25 कोटी खर्च करून घेतले असून, तो गेले कित्येक महिने गुडघ्याचा दुखापतीने त्रस्त आहे.

आपल्या दुखापतीबद्दल आणि चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएलमध्ये सहभागी होण्याबाबत स्टोक्स म्हणाला, ‘‘मी गेले कित्येक महिने गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळे मला मागील काही आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये मनासारख्या धावा काढता आल्या नाहीत. मी आयपीएलमधील सहभागाबाबत चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांच्याशी संवाद साधला आहे. त्यांना आणि संघ व्यवस्थापनामधील सहकाऱ्यांना माझ्या दुखापतीबद्दल माहिती असून, आम्ही सगळे मिळून त्यावर लक्ष ठेवून आहोत.

पुढे तो म्हणाला, आठवड्याने या दुखापतीमध्ये काय सुधारणा होत आहेत याकडे लक्ष ठेवून आहोत. परंतु आता गुडघ्याच्या दुखापतीकडे मी लक्ष देणे सोडले असून, आगामी आयपीएलमध्ये आणि जून महिन्यात होणाऱ्या महत्त्वाच्या ॲशेस स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे.’’ मार्च महिन्याच्या 31 तारखेला आयपीएलचा पहिला सामना माजी विजेते गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये होणार आहे.