Ashes 2019 : बेन स्टोक्सला इंग्लंडच्या उपकर्णधारपदाचा मान

वृत्तसंस्था
शनिवार, 27 जुलै 2019

इंग्लंडचा अष्टपैलू आणि विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात चमकलेल्या बेन स्टोक्सला इंग्लंडचा उपकर्णधार होण्याचा सन्मान देण्यात आला आहे. 

लंडन : इंग्लंडचा अष्टपैलू आणि विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात चमकलेल्या बेन स्टोक्सला इंग्लंडचा उपकर्णधार होण्याचा सन्मान देण्यात आला आहे. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पहिल्या ऍशेस सामन्यासाठी त्याला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 1 ऑगस्चपासून ऍशेस मालिकेला सुरवात होणार आहे. 

इंग्लंडचा संघ : ज्यो रुट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अॅंडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टॉ, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, सॅम करन, ज्यो डेन्ली, जेसन रॉय, बेन स्टोक्स (उपकर्णधार), ओली स्टोन, ख्रिस वोक्स 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ben Stokes named as vice captain of England for the 1st Ashes Test.