अचूक खेळाने बंगळूर बुल्सचे सातत्य

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

पुणे - प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात बंगळूर बुल्स संघाने आक्रमण आणि बचावाच्या आघाडीवर कमालीचा अचूक खेळ करून सातत्यपूर्ण कामगिरी करून दाखवली आहे. अहमदाबाद मध्ये एक बरोबरी आणि एक विजय अशा सातत्यपूर्ण कामगिरीसह बंगळूर आता पुढील आठवड्यात पुण्यात धडकणार आहे. 

पुणे - प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात बंगळूर बुल्स संघाने आक्रमण आणि बचावाच्या आघाडीवर कमालीचा अचूक खेळ करून सातत्यपूर्ण कामगिरी करून दाखवली आहे. अहमदाबाद मध्ये एक बरोबरी आणि एक विजय अशा सातत्यपूर्ण कामगिरीसह बंगळूर आता पुढील आठवड्यात पुण्यात धडकणार आहे. 

सहाव्या मोसमातील लढती आता मधल्या टप्प्यात आल्या आहेत. बंगळूरने आतापर्यंत दहा सामन्यांत सात विजय, दोन पराभव आणि एक बरोबरी अशा कामगिरीसह ४० गुणांनी ‘ब’ गटात आघाडीचे स्थान कायम राखले आहे. पवन शेरावत, रोहित कुमार, काशिलिंग आडके संघाच्या यशात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत आहेत. सहभागी संघांशी तुलना करायची झाल्यास बंगळूर संघ नक्कीच संतुलीत आहे. चढाईंमध्ये बंगळूर वरचढ ठरत असतात तेव्हा त्यांचे बचावपटू त्यांना पूरक साथ करतात; पण जेव्हा चढाईत अपयश येत असते तेव्हा त्यांचे बचावपटू प्रतिस्पर्ध्यांची कोंडी करतात. 

बंगळूर संघ आता आपले घरचे सामने पुण्यात खेळणार आहे. प्रो कबड्डीच्या एकाच मोसमात दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खेळ पाहण्याची पर्वणी पुणेकर साधतील यात शंकाच नाही.

तिकीट विक्रीस सुरवात
बंगळूर बुल्स संघाच्या या मोसमात घरच्या मैदानावरील लढती पुण्यात होत आहेत. या लढतींना २३ ते २९ नोव्हेंबर दरम्यान म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरवात होईल. या सामन्याची तिकीट विक्री सुरू झाली असून,  www.bookmyshow.com या संकेतस्थळावरून तिकिटे बुक करता येतील. तसेच १५ नोव्हेंबरपासून दै. सकाळच्या बुधवार पेठ येथील मुख्य कार्यालय आणि पंडित फार्म (कर्वे नगर), येथे सुरु झाली आहे. तसेच २० नोव्हेंबरपासून म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध असतील.

Web Title: bengaluru bulls Pro kabaddi competition