भारत पेट्रोलियम - इंडियन ऑईल बरोबरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

अखेरच्या तीन मिनिटांत दोन गोल करीत भारत पेट्रोलियमने बंगळूर कप हॉकी स्पर्धेत इंडियन ऑईलला 5-5 असे रोखले. इंडियन ऑईल विश्रांतीस 4-2 आघाडीवर होते.

मुंबई : अखेरच्या तीन मिनिटांत दोन गोल करीत भारत पेट्रोलियमने बंगळूर कप हॉकी स्पर्धेत इंडियन ऑईलला 5-5 असे रोखले. या सामन्यात इंडियन ऑईल विश्रांतीस 4-2 आघाडीवर होते.

अभिरान सुखदेव, मोहम्मद आमीर खान यांनी अखेरच्या मिनिटात गोल करीत पेट्रोलियमची हार टाळली. भारत पेट्रोलियमकडून देविंदर वाल्मीकी, मोहम्मद अमीर खान, शिलानंद लाक्रा यांनीही गोल केले. इंडियन ऑईलकडून अफ्फान युसुफ, तलविंदर सिंग, गुरजिंदर सिंग, सुमित कुमारने गोल केले.

दरम्यान, लष्कर संघाने मुंबईच्या एअर इंडियास 5-3 असे पराजित केले. लष्कराच्या राजंत राजपूतने दोन; तर प्रदीप शिंदे आणि बिनय बंगेराने एक गोल केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bharat petrolium hold indian oil in bangalore hockey

टॅग्स