भुवनेश्‍वरला आंतरराष्ट्रीय हॉकी मेळा

पीटीआय
मंगळवार, 28 मार्च 2017

भुवनेश्‍वर - इंडिया हॉकी लीग आणि आंतरराष्ट्रीय हॉकी चॅंपियन्स करंडक स्पर्धेमुळे उदयास आलेले भारतातील भुवनेश्‍वर आता जणू जगमान्य आंतरराष्ट्रीय हॉकी केंद्र बनून राहणार आहे. चालू आणि पुढील (२०१८) वर्षाच्या अखेरीस भुवनेश्‍वरला जणू आंतरराष्ट्रीय हॉकी मेळाच भरणार आहे. या वर्षाच्या अखेरीस होणारी पुरुषांची वर्ल्ड हॉकी लीग फायनल आणि पुढील वर्षी होणारी पुरुषांची विश्‍वकरंडक स्पर्धा या दोन्ही महत्त्वाच्या स्पर्धांचे आयोजन भुवनेश्‍वर येथे करण्यात येणार आहे. 

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ आणि ओडिशा सरकारने सोमवारी संयुक्तपणे ही घोषणा केली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या दोन्ही मोठ्या स्पर्धा येथील कलिंगा स्टेडियमवर खेळविण्यात येतील.

ओडिशा सरकारच पुरस्कर्ते
या दोन्ही स्पर्धेचे विशेष म्हणजे स्पर्धेची अधिकृत पुरस्कर्ती म्हणून कुठलीही व्यावसायिक कंपनी राहणार नसून, दोन्ही स्पर्धा ओडिशा सरकार पुरस्कृत करणार आहे. त्यामुळे या स्पर्धा ओडिशा पुरुष वर्ल्ड हॉकी लीग फायनल आणि ओडिशा पुरुष हॉकी विश्‍वकरंडक अशाच नावाने ओळखल्या जातील. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष नरिंदर बात्रा म्हणाले, ‘‘ भुवनेश्‍वरला अशा सामन्यांच्या आयोजनाचा चांगला अनुभव असून, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना अशा पर्यावरणपूरक वातावरणात खेळण्याचा आनंद घेता येईल. यानिमित्ताने जगभरातील चाहते येथे येतील.’’

केव्हा होणार स्पर्धा
वर्ल्ड हॉकी लीग फायनल
 १ ते १० डिसेंबर २०१७
 हॉकी विश्‍वातील ८ सर्वोत्तम आणि एक यजमान संघांचा सहभाग
 वर्ल्ड हॉकी लीग उपांत्य फेरीतून संघांची निश्‍चिती

हॉकी विश्‍वकरंडक २०१८
 पुढील वर्षी नोव्हेंबर अखेर आणि डिसेंबरच्या प्रारंभी
 यजमान भारतासह पंधरा संघांचा सहभाग
 हॉकी वर्ल्ड लीग उपांत्य फेरी, आंतरखंडीय अजिंक्‍यपद स्पर्धेतून पात्र

Web Title: Bhubaneswar Hockey International Fair