गुजरातमध्ये होणार जगातील सर्वांत मोठे क्रिकेट मैदान!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

अमहदाबाद - गुजरातमध्ये सरदार पटेल क्रिकेट स्टेडियममध्ये काही बदल करण्यात येणार असून या स्टेडिअमला जगातील सर्वांत मोठे क्रिकेटचे मैदान बनविण्यात येणार आहे. तसेच एक लाख दहा हजार प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्थाही तयार करण्यात येत आहे, याबाबत गुजरात क्रिकेट असोसिएशन महामंडळाने माहिती दिली आहे.

या भव्य-दिव्य मैदानाच्या उभारणीसाठी लार्सन ऍण्ड टर्बो (एल ऍण्ड टी) ही कंपनी पुढाकार घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील हा प्रकल्प गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला जाणार आहे. सध्या या मैदानाची क्षमता 54 हजार प्रेक्षक बसतील एवढी आहे. मैदानाचा कायापालट करण्याचे काम पुढील दोन वर्षांत पूर्ण होणार आहे. सध्या मैदानावर करण्यात येणार बदल हा आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार केला जाणार आहे. "या मैदानावर वातानुकुलित बॉक्‍स, प्रशस्त वाहनतळाची सुविधा, प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याचे मार्ग हे एकदम सहज-सोपे करण्यात येणार आहेत. पर्यटकांना, प्रेक्षकांना जागोजागी माहिती देणारे फलक, नकाशे तसेच माहितीपर संग्रहालय, उभारण्यात येणार आहेत. फूड कोर्ट, फॅन झोन, स्वच्छतागृहे यासारख्या अत्यावश्‍यक सुविधांचा देखील यात समावेश असेल,' अशी माहिती गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव राजेश पटेल यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना दिली.

Web Title: Biggest cricket stadium in world being built in India