केनियावर गच्छंतीचे काळे ढग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

नैरोबी - ऑलिंपिक संघटनेची निवडणूक नियमानुसार न घेतल्याने केनिया ऑलिंपिक संघटनेची आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीतून गच्छंती होण्याची शक्‍यता आहे. रिओ ऑलिंपिक स्पर्धेतील खराब कामगिरीनंतर सुचवलेले संघटनात्मक बदलही केनियाने केलेले नाहीत.

केनिया ऑलिंपिक संघटनेने नवी घटना स्वीकारून निवडणूक घेतली नाही, तर त्यांच्यावर कारवाईशिवाय पर्याय नसेल असे सांगितले जात आहे. केनिया संघटनेतील पदाधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत; तसेच तेथील खेळाडूंना पुरेशा सुविधा न दिल्याचीही टीका होत आहे.

सध्याच्या पदाधिकाऱ्यांची मुदत जूनमध्ये संपत आहे. यासंदर्भात तोडगा काढण्याचे आफ्रिका ऑलिंपिक संघटनेचे प्रयत्नही विफल ठरले आहेत. केनिया क्रीडा मंत्रालयाने खेळाडूंच्या तक्रारीनुसार पाच पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. तरीही घटनाबदल करून निवडणूक घेण्याचा प्रस्ताव केनिया ऑलिंपिक संघटनेत मंजूर झाला नाही.

Web Title: black clouds on kenya