BLOG: 'ऑलिम्पिक'मधील खेळांनी घडविले क्रीडापटू अन्‌ क्रीडाप्रेमीही

olympic
olympic

कधीकाळी आम्ही फक्त आणि फक्त क्रिकेट या खेळाभोवतीच गुंतायचो. कसोटी, वनडे, टि-ट्‌वेंटी याच्यापुढे आमचे "क्रिडाप्रेम' कधी उफाळून यायचेच नाही. भारताने क्रिकेटमध्ये "वर्ल्ड कप' जिंकल्यावर किंवा पाकीस्तानला हरविल्यानंतर "वर्ल्ड कप' जिंकल्याच्या अविर्भावात आम्ही दुचाकीला तिरंगा झेंडा लावून, एफसी रोडवर "भारत माता की जय' म्हणत धिंगाणा घालायचो. पण या क्रिकेटच्या खेळापुढेही दुसरे भरफुर खेळ असतात, त्याला जगात भरपुर " गोल्डन व्हॅल्यू' असते, हे आमच्या कधी मनीध्यानीही नव्हते. फार-फार तर खडकी, रेंजहिल्स भागात मुले हॉकी, फुटबॉल खेळताना तेवढी आमची तिथे थांबवायची, त्यामुळेच का असेना, फुटबॉल "वर्ल्डकप'मध्ये कुठल्या तरी एखाद्या संघाचा आम्ही उधोउधो करायचो (मनातून नसतानाही ).

olympic
'आर्मी मॅन'मुळे टोकियोत वाजली 'जन-गण-मन'ची धून; नीरजला गोल्ड

आम्हाला जसे कळायला लागले तसे, क्रिकेट, फुटबॉल या खेळांपलिकडेही खेळांचे खुप मोठे जग असते. त्या जगात पृथ्वीवरच्या सगळ्याच देशांच्या राष्ट्रीय खेळाचा समावेश असतो, हे आम्हाला केवळ "ऑलिम्पिक'मध्येच कळू लागले. त्यातही कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर झालेल्या "टोकीओ ऑलिम्पिक 2020' मधील कुस्ती, भालाफेक, बॅडमिंटन अशा खास खेळांनी आमचे लक्ष वेधून न घेतले तर नवलचं ! कोरोनामुळे गेली एक ते दिड वर्ष झाले, सगळ्या जगावरच भितीचे सावट आहे. त्यामुळे या पार्श्‍वभुमीवर होणाऱ्या "टोकीओ ऑलिम्पिक'कडे मनोरंजन म्हणूनच नव्हे, तर देशाभिमान म्हणूननही सगळ्यांचे लक्ष होते. विशेषतः आम्ही भारतीय नागरीक, तर यावेळी जरा जास्तच "इमोशनल' झालो होतो. कारण आमची चांगली मोठी टिम यावेळीच्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली होती. प्रसिद्ध खेळांबरोबरच आपल्याला पुरेशी माहिती नसणारे खेळही या स्पर्धेमध्ये होते. त्यामधील खेळाडूही चांगलेच निष्णात होते. त्यामुळे साहजिकच, आमच्यात यावेळी जरा जास्तच पदके मिळतील, हा अभिमान निर्माण झाला होता. मागील काही दिवसांपासून जसजसे "टोकीओ ऑलिम्पिक'मधील दिवस सरत होते, तसतसा आमचाही जीव वरखाली होत होता. इतर खेळांमधले काही कळत नसले तरीही किमान "गोल्ड', "सिल्वर', "ब्रॉन्झ' हि पदके चांगल्या खेळाच्या जोरावर आपण मिळवू शकतो, हे आम्हाला नक्कीच ज्ञात होते. सुरूवातीलाच मीराबाई चानूला वेटिलफ्टींगमध्ये पदक मिळाले, तशी आमच्या इतर खेळाडूंनीही अधिकाधिक पदके मिळवावीत, ही इच्छा मनोमन होऊ लागली. कधी "सिल्वर', तर कधी "ब्रॉन्झ' अशी पदके हळूहळू आमच्या पदरात पडू लागली, त्यामुळे आमच्या आनंदालाही पारावार उरला नाही. एकीकडे "टोकीओ ऑलिम्पिक'मध्ये चीन, अमेरीका पदकांची "सेंच्युरी' वाटचाल दिसत असताना आम्ही मात्र किमान एखादे तरी "गोल्ड मेडल' मिळावे, या अपेक्षेने गेले काही दिवस वाट पाहत होतो. जगाच्या कानाकोपऱ्यातील छोट्या-छोट्या देशांनीही गोल्ड मिळविल्याचे पाहताना, ऐकताना अन्‌ वाचताना आम्ही मात्र, मीराबाई चानू (वेटलिफ्टींग), रवीकुमार दाहिया (कुस्ती), पी.व्ही. सिंधू (बॅडमिंटन पटू), लव्हलिना बोर्गेहेन (मुष्टीयुद्ध), हॉकी (पुरूष), बजरंग पुनीया (कुस्ती) यांना मिळालेल्या रौप्य व कांस्य पदकांचा आनंद "गोल्ड'च्या उत्साहातच साजरा करीत होतो. आमच्यासाठी या खेळाडूंनी मिळविलेली पदके आणि त्यांचा खेळ खरच सुवर्णपदका इतकाच मौल्यवान होता. त्यातही महिला हॉकी टिमने पदक गमावले असले, तरीही त्यांच्या अफलातून खेळामुळे आपण थेट "गोल्ड' जिंकल्याचा अविर्भाव आमच्यात होता, आहे आणि कायम राहिलही. आमच्या लढाऊ मुली हॉकीमध्ये जीवतोड मेहनत घेताना, जिंकण्यासाठी जीवाची बाजी लावताना आम्हीही प्रत्येक क्षण त्यांच्यासोबत जगलो, इतकेच नाही. तर त्या अश्रू ढाळताना आमचेही ह्दय पाझरले. डोळ्यांमध्ये दाटलेले अश्रू कधी एकदाचे गालावरती ओघळले, हे आम्हालाही कळले नाही. कधी थोडाबहूत त्रास आम्हालाही व्हायचाच. त्यातच गोल्फसारख्या "रिच' खेळातही आदिती अशोक हिने अखेरपर्यंत दिलेल्या झुंजीनेही आम्ही अधिकाधिक "श्रीमंत' होत गेलो. रवी दाहिया, बजरंग पुनीया यांच्या कुस्तीतील डावपेचांमध्ये आणि त्यांनी मिळविलेल्या पदकांमध्ये आम्हीच नकळतपणे अडकत गेलो. एकूणच आम्ही आपल्या भारतीय खेळाडूंना मिळालेल्या यश-अपयशामध्ये त्यांच्या समवेतच होतो, त्यांच्या इतकाच आनंद आणि दुःखातही आम्ही त्यांच्याबरोबरच होतो.म्हणजेच काय तर, आपल्या खेळाडूंना मिळालेल्या यशावर आम्ही पुरते समाधानी होतो. विशेषतः आमच्यासारखा सर्वसाधारण क्रिडाप्रेमीला धीरज चोप्रा या नावाची याच "ऑलिम्पिक'मध्ये ओळख झाली. या "ऑलिम्पिक'मध्ये भालाफेक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात इतका लांब भाला फेकला की तो थेट फायनलमध्ये गेल्याचे समाधान साहजिकच आम्हाला लाभले. आत्तापर्यंत मिळालेल्या यशाने हुरळून जाणाऱ्या आम्हासारख्या "कॉमन' प्रेक्षकाने साहजिकच नीरज चोप्राच्या अंतिम सामन्याकडे मने वळविली आणि अखेर धीरजने सर्वाधिक लांब भालाफेक करून भारतासाठी सुवर्णपदक प्राप्त केले आणि आम्हीही भारताने "वर्ल्डकप' जिंकल्याच्या अभिर्वाताच पुन्हा एकदा आपला आनंद जोरात साजरा केला. पण एक खर आहे की, शेवटी "ऑलिम्पिक'चे का निमित्त असेना, आपल्या भारतीय खेळांकडे पुन्हा एकदा आपल्यासारख्या सर्वसाधारण क्रिडाप्रेमी, कोट्यावधी भारतीय आणि भारतीय खेळांकडे दुर्लक्ष करणाऱ्या "सिस्टीम'चे किमान लक्ष्य गेले, हेही नसे थोडके !

olympic
लस न घेतल्यास पुन्हा संसर्गाचा धोका; ‘सीडीसी’च्या अभ्यासातील निरीक्षण

आमच्या लढाऊ मुली हॉकीमध्ये जीवतोड मेहनत घेताना, जिंकण्यासाठी जीवाची बाजी लावताना आम्हीही प्रत्येक क्षण त्यांच्यासोबत जगलो, इतकेच नाही. तर त्या अश्रू ढाळताना आमचेही ह्दय पाझरले. डोळ्यांमध्ये दाटलेले अश्रू कधी एकदाचे गालावरती ओघळले, हे आम्हालाही कळले नाही. कधी थोडाबहूत त्रास आम्हालाही व्हायचाच. त्यातच गोल्फसारख्या "रिच' खेळातही आदिती अशोक हिने अखेरपर्यंत दिलेल्या झुंजीनेही आम्ही अधिकाधिक "श्रीमंत' होत गेलो. रवी दाहिया, बजरंग पुनीया यांच्या कुस्तीतील डावपेचांमध्ये आणि त्यांनी मिळविलेल्या पदकांमध्ये आम्हीच नकळतपणे अडकत गेलो. एकूणच आम्ही आपल्या भारतीय खेळाडूंना मिळालेल्या यश-अपयशामध्ये त्यांच्या समवेतच होतो, त्यांच्या इतकाच आनंद आणि दुःखातही आम्ही त्यांच्याबरोबरच होतो.म्हणजेच काय तर, आपल्या खेळाडूंना मिळालेल्या यशावर आम्ही पुरते समाधानी होतो. विशेषतः आमच्यासारखा सर्वसाधारण क्रिडाप्रेमीला धीरज चोप्रा या नावाची याच "ऑलिम्पिक'मध्ये ओळख झाली. या "ऑलिम्पिक'मध्ये भालाफेक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या धीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात इतका लांब भाला फेकला की तो थेट फायनलमध्ये गेल्याचे समाधान साहजिकच आम्हाला लाभले. आत्तापर्यंत मिळालेल्या यशाने हुरळून जाणाऱ्या आम्हासारख्या "कॉमन' प्रेक्षकाने साहजिकच धीरज चोप्राच्या अंतिम सामन्याकडे मने वळविली आणि अखेर धीरजने सर्वाधिक लांब भालाफेक करून भारतासाठी सुवर्णपदक प्राप्त केले आणि आम्हीही भारताने "वर्ल्डकप' जिंकल्याच्या अभिर्वाताच पुन्हा एकदा आपला आनंद जोरात साजरा केला. पण एक खर आहे की, शेवटी "ऑलिम्पिक'चे का निमित्त असेना, आपल्या भारतीय खेळांकडे पुन्हा एकदा आपल्यासारख्या सर्वसाधारण क्रिडाप्रेमी, कोट्यावधी भारतीय आणि भारतीय खेळांकडे दुर्लक्ष करणाऱ्या "सिस्टीम'चे किमान लक्ष्य गेले, हेही नसे थोडके !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com