PAKvsAUS: ऑस्ट्रेलिया पाकिस्तानात असतानाच ब्लास्ट; दौऱ्यावर प्रश्नचिन्ह

Bomb Blast in Peshawar Australia Cricket Team Pakistan Tour in Danger
Bomb Blast in Peshawar Australia Cricket Team Pakistan Tour in Danger esakal

ऑस्ट्रेलिया तब्बल 24 वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर (Australia Tour Of Pakistan) गेली आहे. आजपासून या दौऱ्याला कसोटी सामन्याने सुरूवात होत आहे. रावळपिंडीमध्ये पहिला कसोटी (Test Match) सामना खेळला जात असतानाच पेशावरमध्ये मोठा बॉम्ब ब्लास्ट (Peshawar Bomb Blast) झाला असून त्यात जवळपास 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 50 जण जखमी झाले आहेत. या ब्लास्टमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) धाबे दणाणले असून एतिहासिक पाकिस्तान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Bomb Blast in Peshawar Australia Cricket Team Pakistan Tour in Danger
..म्हणून विराटची 150 वी कसोटी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर व्हावी

श्रीलंकेची क्रिकेट टीम 2009 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर असताना त्यांच्या बसवर दहशतावादी हल्ला (Terrorist Attack) झाला होता. तेव्हापासून पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट (International Cricket) जवळपास दशकभर बंद होते. अखेर 2019 मध्ये श्रीलंकाच पुन्हा पाकिस्तान दौऱ्यावर गेली. तेव्हा 10 वर्षांनी पाकिस्तानमध्ये कसोटी सामना झाला होता. त्यानंतर बांगलादेश, वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा दौरा केला.

Bomb Blast in Peshawar Australia Cricket Team Pakistan Tour in Danger
विराटने 100 व्या कसोटीत पाँटिंगच्या हातावर मारला हात

गेल्या वर्षी न्यूझीलंड देखील पाकिस्तान दौऱ्यावर गेली होती. मात्र सुरू होण्यापूर्वीच हा दौरा अर्ध्यावर सोडून संघ परतला होता. न्यूझीलंड संघाला धमकी मिळाली होती. न्यूझीलंडनंतर इंग्लंडने देखील आपला पाकिस्तान दौरा रद्द केला होता. मोठ्या प्रयत्नानंतर ऑस्ट्रेलिया पाकिस्तानचा (Pakistan vs Australia) दौरा करण्यास तयार झाली. मात्र पहिल्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानात मोठा बॉम्ब ब्लास्ट झाल्याने आता ऑस्ट्रेलिया आपला दौरा सुरू ठेवणार का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com