बॉक्सर आमिर खानने केली निवृत्तीची घोषणा | Boxer Amir Khan announce Retirement | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Boxer Amir Khan announce Retirement

बॉक्सर आमिर खानने केली निवृत्तीची घोषणा

लंडन : ब्रिटनचा माजी लाईट वेल्टर वेट वर्ल्ड चॅम्पियन आमिर खानने (Amir Khan) बॉक्सिंगमधून (Boxing) निवृत्ती (Retirement) घेतल्याची घोषणा आज केली. फेब्रुवारीमध्ये त्याने प्रतिस्पर्धी बॉक्सर केल ब्रुकला मात दिली होती. आमिर खानने 2004 च्या अथेन्स ऑलिम्पिक गेम्समध्ये लाईट वेट प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली होती. त्यावेळी तो फक्त 17 वर्षाचा होता.

हेही वाचा: VIDEO : सीएसकेला ट्रोल करणाऱ्या युवराजला रैनाने दिले भन्नाट उत्तर

आमिर खानने 2009 मध्ये WBA लाईट वेल्टर बेल्टही जिंकला होता. त्याने युक्रेनच्या अँद्रिये कोटेलन्यक याचा पराभव केला होता. 2011 मध्ये अमेरिकेच्या झॅब ज्युडथला पराभूत करत त्याने IBF टायटल देखील जिंकले होते. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 40 सामन्यापैकी विक्रमी 34 सामने जिंकले आहेत.

हेही वाचा: पुढचा आयपीएल हंगाम खेळणार? खुद्द धोनीनेच केला खुलासा

त्याने आपला शेवटचा सामना त्याचा प्रतिस्पर्धी ब्रुकविरूद्ध खेळला. सहा फेऱ्यांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात विजय मिळवला. ब्रुकने गेल्या आठवड्यात निवृत्ती जाहीर केली होती. दरम्यान आमिर खानने ट्विट केले की, 'आता माझे ग्लोज अडकवून ठेवण्याची वेळ आली आहे. मला अशी दैदिप्यमान कारकिर्द लाभली हे मी माझे भाग्य समजतो. मी 27 वर्षे बॉक्सिंग जगलो. मी ह्रदयापासून माझी टीम, माझे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांचे मला पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानतो.'

Web Title: Boxer Amir Khan Announce Retirement After 27 Years Career

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BoxingAmir Khan
go to top